Breaking News

व्रतस्थाची सावली हरपली सविता दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. प्रेमजी देवजी कन्या विद्यालय, चिंचपोकळी येथे गुजराती भाषेच्या शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ दिनू रणदिवे हे आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
सविताताईं ध्येयवादी पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पाठिशी सावलीसारख्या उभ्या होत्या. एका व्रतस्थाची ही सावली हरपली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
निखळ पत्रकारितेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या दिनू रणदिवे यांच्या मागे सविताताई तितक्याच खंबीरपणे उभ्या होत्या. शिक्षिका म्हणून अनेकांना घडविणाऱ्या सविताताईंनी पतीच्या ध्येयवादी पत्रकारीतेसाठी तितक्याच समर्थपणे साथ दिल्याचे शोक संदेशात म्हटले आहे.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *