Breaking News

सिनेट निवडणुकीत मतदारांना माहिती देण्यात मुंबई विद्यापीठ उदासीन मतदानाची माहितीच मतदारांना कळविली नसल्याचा अनिल गलगलींचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक होती पण पहिल्यांदाच असे घडले की पदवीधर मतदारांना मुंबई विद्यापीठाने साद घातली नाही.मतदान कोठे आहे याची माहितीचे पत्र पाठविले नाही ना मतदार झाले असल्याचे पत्र पाठविले. मुंबई विद्यापीठ याबाबतीत उदासीन असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. गलगली यांनी घाटकोपर पश्चिम येथील आर जे महाविद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजाविला.

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत पदवीधर मतदारांना ते सिनेट निवडणुकीत मतदार झाले असल्याचे कोणतेही पत्र मुंबई विद्यापीठाने पाठविले नाही. २५ मार्च २०१८ रोजीच्या निवडणुकीत मतदारांना कोणत्या मतदान केंद्रावर जावे लागणार आहे, त्याचीही माहिती पाठविली नाही. याबाबत अनिल गलगली यांनी खंत व्यक्त करत प्रतिपादन केले की मुंबई विद्यापीठाने निवडणुकीत शत प्रतिशत मतदानासाठी कोणत्याही प्रकारची तसदी घेतली नाही. यामुळे मतदानांवर परिणाम झाला असून भविष्यात अश्या प्रकारची घोडचूक टाळण्याचे आवाहन अनिल गलगली यांनी सरतेशेवटी केले आहे. विशेष म्हणजे 3 मतदान केंद्रावर प्रत्येकी एका मुंबई विद्यापीठाच्या अधिका-यांची नियुक्ती केल्याने निवडणूक प्रक्रियेत मुंबई विद्यापीठाची उदासीनता जाणवली.

Check Also

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *