Breaking News

भायखळ्यात तापाची साथ, अधिकारी म्हणतात- नगरसेवकाने सांगितले तरच येवू वैद्यकीय शिबिरे घेण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईत भायखळातील बालाजी हॉस्पिटल परिसर या ठिकाणी ३ कोरोना बाधीत रुग्न आढळले असुन ४ आठवड्या पासुन येथे तापाची साथ चालु आहे. नागरीक भयभीत झाले असुन वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे.
संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असुन आपला भारत देश देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटला नाही. सध्या देशात महाराष्ट्र राज्याची परिस्थिती गंभीर असुन दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भायखळा पुर्व विभागातील मसीना रूग्णालयासमोरील बालाजी रूग्णालय परीसरात कोरोनाचे ३ बाधीत रूग्ण सापडले. सध्या तिन्ही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल असून संबधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मात्र या ठिकाणी ३-४ आठवड्यापासून तापाची साथ चालू आहे व त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जवळ जवळ महिना भर भायखळ्यात साथीच्या तापाने डोके वर काढले असून प्रत्येक घरातील किमान दोन सदस्यांना तापाने ग्रासले आहे. सतत डॉक्टरकडे जाऊन देखील तापाचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे नागरीकांच्या मनात शंका कुशंकेने तांडव माजले आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरीक विक्रांत लव्हांडे यांनी ‘ई’ वॉर्डचे एमओ डॉ.गुज्जर तसेच सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन या प्रकरणात ताबडतोब लक्ष घालण्याची मागणी केली. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांच्या मार्फत शिफारस आली तरच लक्ष घालण्यात येणार असल्याची उत्तरे देत असल्याचे लव्हांडे  यांने सांगितले.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *