Breaking News

आरोग्य

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन पध्दतीने आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचे आदेश

आरोग्य विभागाची आस्थापना मोठी आहे. दरवर्षी बदली प्रक्रिया राबविताना अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे विभागाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा

‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या …

Read More »

वैद्यकीय क्षेत्रातील या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांना मिळणार विद्यावेतन बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासितांना विद्यावेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना आता दरमहा आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ ५११ आंतरवासितांना होईल. महानगरपालिकेंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांतील बी.एस्सी. (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना दरमाह आठ हजार रुपये इतके विद्यावेतन त्या-त्या महानगरपालिकांमार्फत …

Read More »

वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला ‘हा’ निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित

देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. …

Read More »

वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा सुरु करा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे आदेश

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या असल्याने त्याकरिता प्रतिक्षायादी आहे. त्यामुळे या रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करुन तात्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन देण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना …

Read More »

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात आजपासून ‘सुंदर माझा दवाखाना’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा

राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून राज्यात आठवडाभर ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम सुरू होत असून सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्ताने …

Read More »

देशभरात ‘या’ तारखेला होणार कोविड मॉक ड्रिल १० आणि ११ एप्रिलला प्रत्येक सरकारी रुग्णालयांमधील व्यवस्थेची पाहणी होणार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोविडचा नवा व्हेरिएंट असलेल्या एच१एन१ विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गत कोविड काळातील परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये याची तपासणी करण्याच्या उद्देशाने सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील यंत्रणा कितपत सज्ज आहे याची पाहणी करण्यासाठी येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी देशव्यापी कोविड मॉक …

Read More »

गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती, कोरोना काळात मागे पडलेले अभियान पुन्हा सुरु राज्यात अवयवदान जनजागृती अभियान

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना राबविली होती. त्यावेळी अवयव …

Read More »

आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिला इन्फ्लूएंझाबाबत ‘हा’ इशारा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष

राज्यात सध्या एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याबाबत आरोग्याच्या सर्व संस्थांना सर्वेक्षण वाढविण्याच्या आणि उपचाराबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती, आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. …

Read More »

गिरीष महाजन म्हणाले, कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करणे शक्य नाही निवासी वैद्यकीय अधिकारी कंत्राटावरच राहणार

मुंबई व महाराष्ट्रात १०६ निवासी वैद्यकीय अधिकारी अजूनही कंत्राटावर असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातील अनेक अधिकारी हे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहेत. १६ वर्षे सेवा होऊनही या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २०१० मध्ये पुन्हा मुलाखती घेतल्या गेल्या. मात्र अद्याप त्यांना कायम करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची …

Read More »