Breaking News

आरोग्य

आषाढी वारीमध्ये ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

“आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, पंढरपूर येथे आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘आरोग्याची वारी …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या आवडत्या कोविन अॅपवरील लसधारकांची माहिती लीक

ऐन कोविड काळात भारतासह जागतिक पातळीवरील जनता हवाल दिल झाली होती. मात्र या कोविडग्रस्त जनतेला लस घेण्यासाठी माय कोविन हे अॅप केंद्र सरकारने एका खाजगी कंपनीच्या मार्फत लाँच केले. विशेष म्हणजे या कोविन अॅपकडून नागरिकांची माहिती सुरक्षित राहिल याची कोणतीही हमी देण्यात आली नव्हती. यासंदर्भात त्याकाळी अनेक तज्ञांकडून कोविन अॅपच्या …

Read More »

…. व्यवस्थापनामध्‍ये वित्तपुरवठ्याची महत्त्वपूर्ण भूमिका केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे मत

आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासारखे आहे. आपल्या समाज- समुदायाची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण, आपल्या अर्थव्यवस्थेची शाश्वतता आणि आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी केलेली गुंतवणूक आहे. शासन, आंतरराष्ट्रीय संघटना आणि खासगी क्षेत्राने एकत्र येऊन निधी पुरवठ्याला चालना देणारे नवे मार्ग शोधण्याची आवश्यकता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण …

Read More »

कोरोना संसर्गाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने केली मोठी घोषणा आता आरोग्य आणिबाणी राहिली नाही

तब्बल तीन वर्ष संपूर्ण जगभरात कोरोनामुळे मोठी उलथापालथ झाली. ज्यामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं होतं, त्या कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने आणिबाणीच्या वर्गवारीतून वगळलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहिर केले की, कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणिबाणी राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला …

Read More »

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील तो प्रकार म्हणजे जातीभेदाला खतपाणी घालणारा रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबविण्याची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे अजित पवार यांनी केली मागणी

नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ …

Read More »

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन पध्दतीने आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचे आदेश

आरोग्य विभागाची आस्थापना मोठी आहे. दरवर्षी बदली प्रक्रिया राबविताना अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे विभागाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा

‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या …

Read More »

वैद्यकीय क्षेत्रातील या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांना मिळणार विद्यावेतन बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासितांना विद्यावेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना आता दरमहा आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ ५११ आंतरवासितांना होईल. महानगरपालिकेंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांतील बी.एस्सी. (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना दरमाह आठ हजार रुपये इतके विद्यावेतन त्या-त्या महानगरपालिकांमार्फत …

Read More »

वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला ‘हा’ निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित

देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. …

Read More »

वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा सुरु करा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे आदेश

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या असल्याने त्याकरिता प्रतिक्षायादी आहे. त्यामुळे या रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करुन तात्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन देण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना …

Read More »