Breaking News

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयींना प्रतिबंध करा आरोग्य विभागाचे आवाहन

राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होवू नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांना आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप तयार करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ सुरू झाली आहे. त्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था व राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचे अन्वेषण केले आहे. राज्यात ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३ लक्ष ५७ हजार २६५ एकूण रुग्ण आढळले आहेत.

जिल्हानिहाय व महानगर पालिका निहाय रुग्णांची आकडेवारी

सर्वात जास्त ४४३९८ रूग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत. त्यानंतर पुणे २८०४२, जळगांव २२४१७, नांदेड १८९९६, चंद्रपूर १५३४८, अमरावती १४७३८, परभणी १४६१४, अकोला १३३८७, धुळे १३२७३, वर्धा ११३०३, नंदुरबार १०२९४, भंडारा १००५४, वाशिम ९४५८, यवतमाळ ९४४१, नांदेड मनपा क्षेत्र ८८५५, मालेगांव जि. नाशिक मनपा ८६५५, लातूर ७०३९, औरंगाबाद ६८३९, पुणे मनपा ६७२०, गोंदीया ६५३२, जालना ६५०६, पिंपरी चिंचवड मनपा ६०१०, हिंगोली ५७८०, नाशिक ५५७५, अहमदनगर ४९९२, कोल्हापूर ४७०२, औरंगाबाद मनपा ४६४३, नागपूर मनपा ४६२०, सोलापूर ४२८२, नाशिक मनपा ३१८३, नागपूर ३०६३, मुंबई २८६२, गडचिरोली २७९६, पालघर १९७७, उस्मानाबाद १९१०, सांगली मनपा १८४८, बीड १६६६, सांगली १५४०, सातारा १५३८, धुळे मनपा १०६५, रायगड ८१६, नवी मुंबई मनपा ७९०, सिंधुदुर्ग ६७९, लातूर मनपा ५५५, चंद्रपूर मनपा ४२९, ठाणे मनपा ४१४, सोलापूर मनपा ४०६, पनवेल मनपा ३२४, अहमदनगर मनपा २२३, रत्नागिरी २२२, ठाणे १८६, परभणी मनपा १६६, अकोला मनपा १५१, भिवंडी निजामपूर मनपा १३३, वसई विरार मनपा १३०, मीरा भाईंदर मनपा १०८, कोल्हापूर मनपा ७४, कल्याण – डोबिंवली मनपा ५८ आणि सर्वात कमी उल्हासनगर मनपा २० रुग्ण आहेत. अशाप्रकारे ३,५७,२६५ रूग्ण राज्यात आढळले आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

महाराष्ट्रात ९ लाखांहून अधिक बालक ‘या’ आजाराने ग्रस्त  जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियातर्गत लहान बालकांची तपासणी सुरु 

महाराष्ट्रात एकाबाजूला हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला राज्यातील बालके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *