गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी दिली. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही …
Read More »डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयींना प्रतिबंध करा आरोग्य विभागाचे आवाहन
राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग …
Read More »बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार या संस्था आणि व्यक्तींना जाहीर डॉ. प्रमोद पोतदार, डॉ.उमेश कदम, डॉ. सदानंद राऊत, संदीप आचार्य मानकरी
सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्कार बाबतची माहिती देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री …
Read More »आरोग्य विभागातील परीक्षा भ्रष्टाचार हा वसुलीबाज ‘वाझें’चाच पराक्रम आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी
मराठी ई-बातम्या टीम आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने या परीक्षेतील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्यमंत्र्यांवर आली आहे. ही परीक्षा देणाऱ्या सुमारे दहा लाख उमेदवारांचे नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नसून विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी …
Read More »आरोग्य विभागाच्या योजनांसाठी आता जिल्ह्याच्या निधीतून पैसे मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय निर्गमित
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित …
Read More »आरोग्य विभागाच्या भरती परिक्षांच्या नव्या तारखा जाहिर, “त्या” क्लिपची चौकशी ९ दिवस पूर्वी परिक्षार्थींना मिळणार हॉल तिकीट-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी परीक्षा आयोजनातील प्रचंड गोंधळामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या नव्या तारखा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जाहीर केल्या. गट क संवर्गासाठी येत्या २४ ऑक्टोबरला तर गट ड संवर्गासाठी ३१ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहेत. परंतु या परिक्षांच्या नव्याे तारखा जाहिर करण्यात आलेल्या असल्या तरी संपूर्ण …
Read More »आरोग्य विभागाच्या गट क आणि ड वर्गासाठी या तारखेला परिक्षा उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ …
Read More »पुण्यात झिका आजाराचा रूग्ण काल आढळला आणि आज बराही झाला आरोग्य विभागाची माहिती
मुंबई: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणु …
Read More »अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अंथरूणाला खिळून असलेल्या रूग्णांचे लसीकरण कसे करायचे, त्यांना लसीकरणासाठी कसे न्यायचे असा प्रश्न अनेक कुटुंबियांना पडला होता. मात्र आरोग्य विभागानेच यावर मार्ग काढत अंथरूणावर खिळून असलेल्या रूग्णांसाठी घरपोच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून एक ई-मेल प्रसिध्द करण्यात आला असून …
Read More »आरोग्य विभागाची १६००० पदांची नोकरभरती : आठभरात प्रक्रिया पूर्ण होणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या …
Read More »