Breaking News

आता शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात इन्फल्यूएंझाग्रस्तांसाठी कक्ष

राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृष्य रूग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येत आहे. तसेच राज्यातील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

रूग्णालयांमध्ये आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय व खासगी डॉक्टरांचे क्लिनीकल मॅनेजमेंटबाबत राज्यस्तरावरून पुर्नप्रशिक्षण ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आले आहे. राज्यात २०२३ मध्ये २८ नोव्हेंबरपर्यंत एकूण संशयीत रूग्ण १५ लाख ९७ हजार २३४ होते, तर बाधीत इन्फ्लुएंझा ए (एच 1 एन 1 + एच 3 एन 2) ३२२२ रूग्ण आहेत. सध्या रूग्णालयात १४ रूग्ण दाखल आहेत. तर ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सहसंचालक, आरोग्य सेवा डॉ. प्रतापसिंह सारणीकरण यांनी दिली.

Check Also

मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश, परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरा

परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *