Breaking News

कोरोना चाचणीबाबत आयसीएमआरने जारी केल्या या नव्या गाईडलाईन्स चाचणी कोणी आणि कधी करावी याबाबत स्पष्ट सूचना

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर कोणत्या नागरीकांनी चाचणी करावी, कोणी करू नये आणि कोणती चाचणी करावी या अनुषंगाने आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च संस्थेने सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

कोविड आणि ओमायक्रॉनची लक्षणे आढळून आल्याबरोबर रूग्णाने तातडीने स्वत:ला लगेच विलगीकरण करून घ्यावे आणि उपचार करून घेण्यास सुरुवात करावी.

ज्येष्ठ नागरीक (६० वर्षाहून अधिक) आणि सहव्याधी (मधुमेह, हायपर टेन्शन, क्रोनिक लंग किंवा किडनीचे आजार, लठ्ठपणा, मलिजन्सी यासह इतर) असलेल्या नागरीकांनी काळजी संसर्गापासून काळजी घेण्याची गरज आहे. जर संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास लगेच चाचणी करून उपचारास सुरुवात करावी.

कोविड १९ च्या उपलब्ध चाचण्या

पाँईट ऑफ केअर टेस्ट– घरच्या घरीच किंवा स्वत: टेस्ट करणे/ रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट

मॉलेक्युलर टेस्ट– आरटीपीसीआर, ट्रुनॅट, सीबीनॅट, सीआरआयएसपीआर, आरटी-लॅप, रॅपिड मोलेक्युलर टेस्टींग सिस्टीम, न्युवर सार्स-कोव्ही-२ ओमायक्रॉन किंवा व्हेरिएंट डिटेक्शन आरटीपीआर अॅसे

कोण या चाचण्या करू शकतो?

लक्षणे (कफ, ताप, सोर थ्रोट, तोंडाची चव जाणे-वास येणे बंद होणे, ब्रेथलेसनेस (श्वासोच्छवास जलद गतीने किंवा घेण्यास अडचण येणे) आणि इतर लक्षणे दिसणारा) कोणताही व्यक्ती चाचणी करू शकतो.

ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे अशा व्यक्ती (मधुमेह, हायपर टेन्शन, क्रोनिक लंग किंवा किडनीचे आजार, लठ्ठपणा, मलिजन्सी यासह इतर)

आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेला व्यक्ती.

आतरराष्ट्रीयस्तरावरचा समुद्री मार्गाने, विमानाने, बोटीने प्रवास करून आलेला व्यक्ती.

रूग्णालयातील चाचणीची व्यवस्था:-

उपचार करणाऱ्या डॉक्टराकडून चाचणी करता येवू शकेल. तसेच त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

महत्वाच्या शस्त्रक्रिया किंवा बाळंतपणाच्या वेळी चाचणी नाही केली तरी चालू शकते. परंतु चाचणीच्या नावाखाली उशीर करू नये.

चाचणीची सुविधा उपलब्ध नाही म्हणून त्यास अन्य सुविधा रेफर करू नये. चाचणी केल्यानंतर त्याचे सॅम्पल जमा करून ते योग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करावी.

जे रूग्ण शस्त्रक्रियेसाठी किंवा महिला बाळंतपणासाठी रूग्णालयात दाखल झालेले असतील आणि त्यांना कोविडची लक्षणे नसतील तर त्यांची टेस्ट करू नये.

या लोकांनी चाचणी करण्याची गरज नाही:-

ज्यांना कोणत्याही पध्दतीची लक्षणे नाहीत.

ज्यांचा कोविड बाधितांशी संपर्क आला नसेल किंवा ज्यांना सह व्याधी आणि ज्येष्ठ वयोमानामुळे जर बाधितांशी संपर्क आला नसेल तर त्यांनी चाचणी करू नये.

गृह विलगीकरणातून डिस्जार्च मिळालेल्या रूग्णाने चाचणी करू नये.

सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार ज्यांना कोविड१९ मधून डिस्जार्च मिळालेला आहे अशांनी चाचणी करण्याची गरज नाही.

राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांनी चाचणी करण्याची गरज नाही.

चाचणी करण्याबाबत आयसीएमआरने जारी केलेल्या गाईडलाईन्स खालीलप्रमाणे:-

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *