Breaking News

कोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी

भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीवर सगळ्यांच लक्ष आहे. तसेच त्याच्या यशस्वी ट्रायलनंतर लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस बनविणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली.

कोरोनावर लस बनविणाऱ्या भारतातील प्रमुख इन्स्टीट्युटना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यात या इन्स्टीट्युटचा समावेश होता. त्यानंतर अदर पुनावाला यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत वरील माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगत करोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. लसीच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण माहिती दिली. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे. जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लसचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.  आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतला.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *