Breaking News

राज्यात ५२ हजार कोरोनाग्रस्तांपैकी ३५ हजार रूग्ण अॅक्टीव्ह २ हजार ४३६ नवे रूग्ण, ६०जणांचा मृत्यू तर १५ हजार बरे होवून घरी

मुंबई: प्रधिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कालच्या तुलनेत २ हजार ४३६ ने आज वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात ३५ हजार १७८ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. तसेच ११८६ जणांना आज घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ हजार ७८६ इतकी झाली असून ६० जणांचा २४ तासात मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तर मुंबईतील मृत्यू पावणाऱ्यांची संख्या एक हजारवर २६ वर पोहोचली असून राज्यातील १६९५ जणांचा मृत्यू झाले. राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ४७ जणांमध्ये ( ७८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
प्रयोगशाळा तपासण्या –आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,७८,५५५ नमुन्यांपैकी ५२,६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
 क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २३९१ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,१०६ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.०१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे – 1.आजपर्यंत राज्यातून १५,७८६ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 2.सध्या राज्यात ५,३०,२४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३१९७२ १०२६
ठाणे          ४५७
ठाणे मनपा २७३९ ३८
नवी मुंबई मनपा २०६८ ३२
कल्याण डोंबवली मनपा ९४१
उल्हासनगर मनपा १८०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ९८
मीरा भाईंदर मनपा ४७५
पालघर १२०
१० वसई विरार मनपा ५९७ १५
११ रायगड ४३१
१२ पनवेल मनपा ३६० १२
  ठाणे मंडळ एकूण ४०४३८ ११५४
१३ नाशिक १२३
१४ नाशिक मनपा १२९
१५ मालेगाव मनपा ७२१ ४४
१६ अहमदनगर ५७
१७ अहमदनगर मनपा २०
१८ धुळे २३
१९ धुळे मनपा ९५
२० जळगाव ३०१ ३६
२१ जळगाव मनपा ११७
२२ नंदूरबार ३२
  नाशिक मंडळ एकूण १६१८ १०३
२३ पुणे ३६०
२४ पुणे मनपा ५३१९ २६०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३१७
२६ सोलापूर २४
२७ सोलापूर मनपा ५९९ ४०
२८ सातारा ३१४
  पुणे मंडळ एकूण ६९३३ ३२१
२९ कोल्हापूर २४४
३० कोल्हापूर मनपा २३
३१ सांगली ७२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १६७
  कोल्हापूर मंडळ एकूण ५२७
३५ औरंगाबाद २६
३६ औरंगाबाद मनपा १२६३ ४८
३७ जालना ६३
३८ हिंगोली १३२
३९ परभणी १८
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १५०८ ४९
४१ लातूर ७४
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ३७
४४ बीड ३२
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
  लातूर मंडळ एकूण २४९
४७ अकोला ३६
४८ अकोला मनपा ३८४ १५
४९ अमरावती १५
५० अमरावती मनपा १६७ १२
५१ यवतमाळ ११५
५२ बुलढाणा ४१
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ७६६ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४६८
५६ वर्धा
५७ भंडारा १४
५८ गोंदिया ४३
५९ चंद्रपूर १५
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली १५
  नागपूर एकूण ५७७
  इतर राज्ये /देश ५१ १२
  एकूण ५२६६७ १६९५

( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १०० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. )

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *