Breaking News

दोन महिन्यात २० हजार रूग्ण तर २४ तासात सर्वाधिक ४८ जणांचे मृत्यू मुंबई-ठाणे मंडळ १५ हजार ५९५ : दिवसभरात ३३० बरे होवून घराकडे

मुंबई: विशेष प्रतिनिधी
साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही आजच झाले असून त्यांची संख्या ४८ च्या घरात आहेत. याशिवाय मुंबई-ठाणे मंडळाने १५ हजाराचा टप्पा ओलांडत १५ हजार ५९५ वर पोहोचला आहे.
( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १७८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. आज पालघर जिल्ह्यातील बाधित रुग्णांना त्यांच्या मूळ पत्त्यानुसार वसई विरार आणि मीरा भाईंदर मनपामध्ये दर्शविण्यात आले आहे. )
मृत्यू –
आज राज्यात ४८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९ , मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती – आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर २७ महिला आहेत. आज झालेल्या ४८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणा-या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ७२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७७९ झाली आहे. प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,२७,८०४ नमुन्यांपैकी २,०६,४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २०,२२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,३८८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
१. आजपर्यंत राज्यातून ३८०० रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
२. सध्या राज्यात २,४१,२९० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       १२८६४ ४८९
ठाणे           ११०
ठाणे मनपा ८००
नवी मुंबई मनपा ७८९
कल्याण डोंबवली मनपा ३१६
उल्हासनगर मनपा २०
भिवंडी निजामपूर मनपा २१
मीरा भाईंदर मनपा २०१
पालघर ३२
१० वसई विरार मनपा २१६
११ रायगड ८९
१२ पनवेल मनपा १३७
  ठाणे मंडळ एकूण १५५९५ ५२४
१३ नाशिक ५०
१४ नाशिक मनपा ७३
१५ मालेगाव मनपा ४७२ २०
१६ अहमदनगर ५१
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा ४२
२० जळगाव १११ १२
२१ जळगाव मनपा २२
२२ नंदूरबार १९
  नाशिक मंडळ एकूण ८५७ ४०
२३ पुणे ११८
२४ पुणे मनपा १९७५ १४१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा १८४ १०
२८ सातारा ९८
  पुणे मंडळ एकूण २५१३ १६१
२९ कोल्हापूर १३
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी १८
  कोल्हापूर मंडळ एकूण ७७
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ४३७ १२
३७ जालना १२
३८ हिंगोली ५८
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ५१४ १३
४१ लातूर २५
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ३०
  लातूर मंडळ एकूण ६२
४७ अकोला
४८ अकोला मनपा १३४ १०
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ७८ ११
५१ यवतमाळ ९५
५२ बुलढाणा २४
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ३४५ २४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा २२२
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण २३०
  इतर राज्ये ३५
  एकूण २०२२८ ७७९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *