Breaking News

कोरोना : नागपूर- मुंबईत थोडासा फरक तर मृतकांची संख्या ५२ हजाराच्या पार ८ हजार ६२३ नवे बाधित, ३ हजार ६४८ बरे झाले तर ५१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील सलग चार दिवसांपासून राज्यात बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण सतत ८ हजाराहून अधिक संख्येने कायम राहिले आहे. तर मुंबईतील कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. दिवसभरात आज ९८७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईसह ठाणे मंडळातील १२ महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये सर्वाधिक १८२३ बाधित रूग्ण आढळून आले. तसेच नागपूर शहरात ८३८ तर जिल्ह्यात २५६ बाधित आढळून आल्याने एकट्या नागपूरात १०९३ इतके बाधितांचे निदान झाले. या दोन शहरांच्या तुलनेत अमरावतीसह अकोला मंडळातील बाधितांची संख्या कमी आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही बाधितांची संख्या १४०० हून अधिक नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही चारही भागात पुन्हा एकदा आठ महिन्यापूर्वीची परिस्थिती निर्माण होत आहे.

दिवसभरात राज्यात ८ हजार ६२३ नव्या रूग्णांचे निदान झाले, तर ३,६४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७२ हजार ५३० इतकी झाले आहे. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख २० हजार ९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१४% एवढे झाले आहे. याशिवाय राज्यात ५१ जणांच्या मृत्यांची नोंद होत मागील ११ महिन्यात एकूण मृतकांची संख्या ५२ हजार ०९२ इतकी नोंदविली गेल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,४६,७७७ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,३४,१०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,०८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९८७ ३२४८६६ ११४७०
ठाणे ८६ ४२८२९ ९९६
ठाणे मनपा २०२ ६२६५८ १२५३
नवी मुंबई मनपा ११६ ५९६६४ ११४०
कल्याण डोंबवली मनपा १८९ ६६९४७ १०५९
उल्हासनगर मनपा १७ ११८९२ ३५१
भिवंडी निजामपूर मनपा ६९३९ ३४१
मीरा भाईंदर मनपा ५२ २८७०४ ६६७
पालघर १७२१३ ३२१
१० वसईविरार मनपा ४६ ३१६७० ६१८
११ रायगड ३३ ३८२६३ ९९२
१२ पनवेल मनपा ८१ ३२३५० ६०८
ठाणे मंडळ एकूण १८२३ ७२३९९५ १९८१६
१३ नाशिक १५३ ३८८५६ ८०६
१४ नाशिक मनपा ५५० ८४१७१ १०७५
१५ मालेगाव मनपा २२ ५०१२ १६५
१६ अहमदनगर १७८ ४८३९२ ७३२
१७ अहमदनगर मनपा ९३ २६८६६ ४०८
१८ धुळे २२ ८९६५ १८७
१९ धुळे मनपा ६२ ७९६७ १५०
२० जळगाव १७० ४६२३३ ११७३
२१ जळगाव मनपा २११ १४५७७ ३३१
२२ नंदूरबार ५७ १०२९१ २२०
नाशिक मंडळ एकूण १५१८ २९१३३० १० ५२४७
२३ पुणे ४०१ ९७९१० २१५३
२४ पुणे मनपा ७४३ २०८४७९ ४५७४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३४० १०१८४७ १३२९
२६ सोलापूर ६१ ४४१६५ १२१९
२७ सोलापूर मनपा ४० १३६८४ ६२४
२८ सातारा १८० ५८६७५ १८४३
पुणे मंडळ एकूण १७६५ ५२४७६० ११७४२
२९ कोल्हापूर १६ ३४८२९ १२५७
३० कोल्हापूर मनपा २१ १४८३७ ४२१
३१ सांगली ११ ३३१८३ ११६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८१२६ ६२९
३३ सिंधुदुर्ग ६६०३ १७७
३४ रत्नागिरी ४२ १२०९९ ४१९
कोल्हापूर मंडळ एकूण १०३ ११९६७७ ४०६५
३५ औरंगाबाद २४ १६००४ ३३३
३६ औरंगाबाद मनपा २४२ ३६३३९ ९३५
३७ जालना १०२ १४४६६ ३७८
३८ हिंगोली १६ ४७२५ १००
३९ परभणी १६ ४६८२ १६५
४० परभणी मनपा २६ ३८३७ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण ४२६ ८००५३ २०४३
४१ लातूर ४५ २१९७८ ४७५
४२ लातूर मनपा ३४ ३६०९ २३२
४३ उस्मानाबाद १४ १७९७४ ५६५
४४ बीड ७७ १९०८५ ५६४
४५ नांदेड २८ ९२४५ ३९०
४६ नांदेड मनपा ६५ १४०७४ २९६
लातूर मंडळ एकूण २६३ ८५९६५ २५२२
४७ अकोला १८२ ५७०९ १३९
४८ अकोला मनपा १०५ ९४८५ २४०
४९ अमरावती १२२ ११२४७ १९७
५० अमरावती मनपा ४२३ २३८३७ २७०
५१ यवतमाळ १८१ १८०१८ ४७८
५२ बुलढाणा २२७ १७५७८ २६५
५३ वाशिम १२४ ८९२६ १६२
अकोला मंडळ एकूण १३६४ ९४८०० १३ १७५१
५४ नागपूर २५६ १९०७१ ७९२
५५ नागपूर मनपा ८३८ १३१६८५ २७१८
५६ वर्धा १६१ १३०१३ ३११
५७ भंडारा ३९ १३९४३ ३१३
५८ गोंदिया २२ १४५७७ १७३
५९ चंद्रपूर १७ १५३६९ २४८
६० चंद्रपूर मनपा ११ ९३८८ १६४
६१ गडचिरोली १७ ९००५ ९९
नागपूर एकूण १३६१ २२६०५१ ४८१८
इतर राज्ये /देश १४६ ८८
एकूण ८६२३ २१४६७७७ ५१ ५२०९२

आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५ मृत्यू अकोला- १, बुलढाणा- १, रायगड- १, ठाणे -१ आणि नागपूर -१असे आहेत.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *