Breaking News

रिलायन्स जिओचा आयपीओ येणार, मूल्यांकन १०० अब्ज डॉलर गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

मराठी ई-बातम्या टीम

मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यावर्षी (आयपीओ) IPO आणू शकते. आयपीओचे मूल्यांकन ७.४० लाख कोटी म्हणजेच १०० अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. ह्या आयपीओच्या लिस्टिंगनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही समूहातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल.
परदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने जिओ या वर्षात शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. वर्ष २०२० मध्ये Jio मधील सुमारे ३३% हिस्सा १३ गुंतवणूकदारांना विकला गेला आहे. यापैकी जवळपास १०% फेसबुकला आणि ८% गुगलला हिस्सा विकला आहे.  रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीचे ४२ कोटींहून अधिक ग्राहक होते.
रिलायन्सने २०२० मध्ये Jio मधील स्टेक विकून १.५२ लाख कोटी रुपये मिळवले. गुगल आणि फेसबुकने मिळून जिओमध्ये ७७,३११ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन्ही कंपन्यांचा जिओमध्ये १८ टक्के हिस्सा झाला आहे. जिओने किरकोळ क्षेत्रातील १०% पेक्षा जास्त हिस्सा विकून ४७ हजार कोटी रुपये उभे केले. CLSA ने सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की रिलायन्स जिओ आयपीओ स्वतंत्रपणे सूचीबद्ध केला जाऊ शकतो. त्याचे मूल्य ९९ अब्ज डॉलर असू शकते.
जानेवारीच्या अखेरीस जिओचे ४३ कोटी ग्राहक असण्याची अपेक्षा आहे. तर दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या एअरटेलचे ३२ कोटी सदस्य आहेत. मात्र, एअरटेल प्रति ग्राहक कमाईत पुढे आहे. ते प्रति ग्राहक १५७ रुपये कमवते. तर Jio १४४ रुपये कमावते. मात्र, किमती वाढल्याने सर्वच कंपन्यांच्या प्रति ग्राहक उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे.
अलीकडेच एअरटेलसह तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी किमतीत प्रचंड वाढ केली आहे. आधी व्होडाफोनने किंमत वाढवली, नंतर एअरटेल आणि शेवटी जिओने वाढवली. २०२१ मध्ये जिओचा मार्केट शेअर जवळपास ३९% होता. रिलायन्स जिओने जिओ फोन नेक्स्ट लॉन्च केला आहे.
२०२० मध्ये जेव्हा रिलायन्सने Jio मधील भागभांडवल विकून पैसे उभे केले, तेव्हा त्याचे एंटरप्राइझ मूल्यांकन ५.१६ लाख कोटी रुपये होते. तर बाजाराचे मूल्यांकन ४.९१ लाख कोटी रुपये होते. त्या आधारावर जिओच्या एका शेअरची किंमत ८८५ रुपयांच्या जवळ पोहोचली होती. सध्या जिओमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी सुमारे ६७% आहे.
या आधारावर पाहिले तर कंपनी IPO मध्ये १७% पर्यंत हिस्सा विकू शकते. कारण रिलायन्स इंडस्ट्रीजमध्‍ये प्रवर्तकांचा ५०% हिस्सा आहेत. या १७% साठी जिओला ८५ हजार कोटी मिळू शकतात. तथापि, बाजारातील परिस्थिती आणि पुढे जाऊन उच्च मूल्यावर विक्री करण्याच्या धोरणावर अवलंबून, कंपनी कमी भागासाठी देखील विक्री करू शकते.

Check Also

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *