Breaking News

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, रूग्णसंख्या वाढली तरी घाबरण्याचे कारण नाही कडक निर्बंध लागू करण्याबाबत मात्र सुतोवाच

मराठी ई-बातम्या टीम

नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत एकाबाजूला रूग्ण संख्या वाढत असली तरी दुसऱ्याबाजूला हॉस्पीटलायझेनच्या संख्येचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा तुर्तास कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.

ते आज जालन्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार नसला तरी कडक निर्बंध लागू करावे लागणार आहेत. हे निर्बंध कदाचीत नाईट कर्फ्यु सारखे असतील. ज्या अत्यावश्यक गोष्टीमध्ये येत नाहीत अशा गोष्टींवर बंद करावे लागतील. जसे की मुंबई रात्रीही जागी असते. मात्र आता काही काळासाठी रात्रीची मुंबई बंद केली तर कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होईल अशा काही गोष्टीं बंद करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्याचबरोबर मुंबईतील लोकलवर सध्या कोणत्याही स्वरूपाचे निर्बंध लादण्यात येणार नसल्याचे सांगत सध्या तशी गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काल राज्यात ३६ हजार करोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असून आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणे गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे असे मत व्यक्त करत याशिवाय निर्बध कडक करावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी सांगितले.

मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील असेही त्यांनी सांगितले.

ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट करत मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर कठोर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
देशात करोनाचा विस्फोट झाला आहे. संसर्गसाठी गर्दी टाळली पाहिजे. गर्दी टाळली तरच संसर्ग कमी होईल असे सांगत चित्रपट, नाट्यगृह,मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  दरम्यान, राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून १० तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा. या महामारीतुन नागरीकांना फक्त लस वाचवेल असेही त्यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *