Breaking News

सरस्वती साडी डेपोचा आयपीओ सेबीकडे अर्ज दाखल

महाराष्ट्रस्थित सरस्वती साडी डेपोने आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. या आयपीओमध्ये सरस्वती साडी डेपो ७२.४५ लाख नवीन शेअर्सची विक्री करणार आहे. तसेच प्रवर्तकांकडून ३५.५५ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकले जाणार आहेत.

तेजस दुल्‍हानी, अमर दुल्‍हानी, शेवक्रम दुल्‍हानी, सुजानदास दुल्‍हानी, तुषार दुल्‍हानी आणि निखिल दुल्‍हानी हे प्रवर्तक ऑफर फॉर सेलमध्ये आपले शेअर्स विकणार आहेत. कंपनी आयपीओमधून मिळणारे पैसे मुख्यतः खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वापरेल. तसेच हा निधी सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरला जाईल. या आयपीओसाठी युनिस्टोन कॅपिटल मर्चंट बँकर तर बिगशेअर सर्व्हिसेस हे रजिस्ट्रार आहेत.

सरस्वती साडी डेपोचा ९० टक्क्यांहून अधिक महसूल साड्यांच्या विक्रीतून येतो. मात्र, कंपनी कुर्ती, ड्रेस मटेरियल, ब्लाउज पीस, लेहेंगा आणि बॉटम्ससह इतर महिलांच्या कपड्यांच्या घाऊक व्यवसायातही आहे. मार्च २०२३ मध्ये संपलेल्या वर्षात कंपनीने १५,००० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आणि तिच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ३,००,००० पेक्षा जास्त SKU (स्टॉक ठेवण्याचे युनिट्स) समाविष्ट आहेत.

सरस्वती साडी डेपोने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आर्थिक वर्ष २२ मधील ५४९.६ कोटींवरून कंपनीचे कामकाजातील महसूल वाढून ६०१.९ कोटी रुपये झाला आहे. तर याच कालावधीत निव्वळ नफा १२.३ कोटींवरून २२.९७ कोटी रुपये झाला आहे.

Check Also

इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारकडून सुतोवाच

येत्या काही दिवसांत सरकार नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणावर मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येण्याची शक्यता आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *