Breaking News

दिवाळीच्या या खास वेळी शेअर बाजारात पैसे कमवण्याची संधी जाणून घ्या मुहुर्त ट्रेडिंगबद्दल

मुंबईः प्रतिनिधी
शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्तच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात.
मुहूर्त ट्रेडिंग केल्याने गुंतवणुकदारांची वर्षभर भरभराट होईल असे म्हटले जाते. बीएसई आणि एनएसई दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन करतात. लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजारात सुट्टी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी बाजारात फक्त एक तास ट्रेडिंग केलं जातं. या एका तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात. मुहूर्ताच्या वेळी केलेली गुंतवणूक शुभ असते, असे मानले जाते.
दिवाळीच्या निमित्ताने ४ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) संध्याकाळी ६:१५ वाजल्यापासून एक तासाचा विशेष मुहूर्त असेल. दिवाळीला मुहूर्ताचं ट्रेडिंगमध्ये संध्याकाळी ६:०० ते संध्याकाळी ६:०८ पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. यानंतर मुहुर्त ट्रेडिंग संध्याकाळी ६:१५ ते संध्याकाळी ७ः १५ पर्यंत होईल, असे बीएसई आणि एनएसईने सांगितले आहे.
दिवाळीसह नवीन वर्षाची सुरुवात देखील होते. यावेळी संवत २०७७ ची सुरुवात दिवाळीने होणार आहे. भारतीय परंपरेनुसार, दिवाळी देशाच्या अनेक भागांमध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात देखील करते. या शुभ वेळेला शेअर बाजारातील व्यापारी विशेष शेअर ट्रेडिंग करतात. म्हणून याला मुहूर्त ट्रेडिंग असे म्हणतात. या विशेष ट्रेडिंग सेशनमध्येच बरेच लोक शेअर बाजारातील गुंतवणुकीची सुरुवात करतात.
मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात पैसे गुंतवणं शुभ मानलं जातं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषतः श्रीमंत लोक निश्चितपणे या दिवशी गुंतवणूक करतात. ते छोट्या गुंतवणुकीवर लाखो रुपये कमवतात. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर ट्रेडिंग करून सुरू करून गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्ष चांगलं जाण्याची इच्छा व्यक्त करतात. मुहूर्त ट्रेडिंग पूर्णपणे परंपरेशी संबंधित आहे. बहुतेक लोक या दिवशी शेअर्स खरेदी करतात. तथापि, ही गुंतवणूक अत्यंत लहान आणि प्रतीकात्मक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मुहूर्ताच्या ट्रेडिंगदिवशी व्यापारी गुंतवणुकीचा विचार करून बाजारात प्रवेश करतात. परंपरा मानणारे सहसा पहिली ऑर्डर खरेदीची देतात. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दरवर्षी बदलत राहते. त्या दिवसातील शुभ समजल्या जाणा-या वेळेनुसार ही वेळ ठरवली जाते. १९५७ पासून बीएसई हे विशेष ट्रेडिंग सेशनचे आयोजन करत आहे. त्यानंतर १९९२ पासून एनएसईद्वारे याचे आयोजन होत आहे

Check Also

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *