Breaking News

मोठी बातमीः पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये १८४ जागांसाठी नोकर भरती सुरू या संकेतस्थळावर थेट अर्ज भरा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२३ आहे.

रिक्त जागा : १८४

पदाचे नाव : इंजिनिअर ट्रेनी

पदांचा तपशील आणि रिक्त पदसंख्या :

इलेक्ट्रिकल – १४४

सिव्हिल – २८

इलेक्ट्रॉनिक्स – ६

कॉम्प्युटर सायन्स – ०६

शैक्षणिक पात्रता
1) ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.) 2) GATE 2023

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १० नोव्हेंबर २०२३ रोजी २८ वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पगार किती?
निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत ४०,००० रुपये – ३ टक्के- १,४०,००० (IDA) वेतनश्रेणीत ठेवण्यात येईल. त्यांना मूळ वेतन ४०,००० रुपये, IDA, HRA आणि लाभांसह प्रशिक्षण कालावधीत मूळ वेतनाच्या १२ टक्के प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर आणि नियमित झाल्यावर, उमेदवाराला E2 स्केलमध्ये अभियंता म्हणून सामावून घेतले जाईल – . ५०,००० रुपये- ३ टक्के- १,६०,००० रुपये(IDA).

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.powergrid.in.

Check Also

आरबीआयच्या पतधोरणात वातावरणीय घटनांचा उल्लेख

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) च्या ताज्या चलनविषयक धोरण अहवालाचे (त्याच्या एप्रिल बुलेटिनमध्ये समावेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *