Breaking News

फेडरल बँकेकडून एफडी व्याजदरात वाढ आता मिळेल इतके व्याज

तुम्हीही सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फेडरल बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. फेडरल बँक ४०० दिवसांच्या एफडीवर आता सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ४०० दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ८.१५ टक्के तर सर्वसामान्यांना ७.६५ टक्के व्याज देत आहे.

फेडरल बँकेच्या बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक ७ ते २९ दिवसांच्या एफडीवर ३ टक्के, ३० ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.२५ टक्के, ४६ दिवस ते ६० दिवसांच्या एफडीवर ४.०० टक्के, ६१ दिवस ते ११९ दिवसांच्या एफडीवर ४.७५ टक्के, १२० ते १८० दिवसांच्या एफडीवर ५ टक्के व्याजदर देत आहे. तसेच फेडरल बँक १८१ दिवस ते २७० दिवसांच्या एफडीवर ५.७५ टक्के आणि २७१ दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६ टक्के व्याजदर देत आहे.

फेडरल बँक १ वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ६.८० टक्के व्याजदर आणि १५ महिने ते २ वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ७.२५ टक्के व्याजदर देत आहे. तर दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.७५ टक्के, तीन वर्षापासून पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.६० टक्के, ५ वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीच्या एफडीवर ६.६० टक्के व्याज मिळेल. फेडरल बँक ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज देत आहे.

Check Also

HCL Technologies ने जाहिर केला डिव्हिडंड आयटी फर्मच्या निव्वळ नफाही नोंदविला

HCL Technologies (HCLTech) ने २६ एप्रिल रोजी Q4FY24 मध्ये ३,९८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *