Breaking News

‘संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’ थाटात संपन्न नाट्यरसिकांची प्रचंड गर्दी

मुंबई : प्रतिनिधी

कलाकार आणि तंत्रज्ञांनी केलेल्या कामाचं कौतुक करीत त्यांच्या कलागुणांचा पुरस्काराच्या रूपात सन्मान करणाऱ्या ‘१८ वा संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात पार पडला. एरव्ही नाटकांना गर्दी होत नसल्याचं पाहायला मिळतं, पण ‘संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’ हा सोहळा याला अपवाद ठरला. नाट्यरसिकांनी तुडुंब भरलेल्या या सोहळ्याला मराठी नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनीही विशेष हजेरी लावत आयोजकांचा उत्साह वाढवला.

‘संस्कृती कलादर्पण’चे संस्थापक-अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे, अध्यक्षा अर्चना नेवरेकर, स्टार प्रवाहाच्या हेड श्रावणी देवधर, मनसे महिला प्रमुख शर्मिला ठाकरे, अभिनेत्री स्मिता जयकर, विजय पाटकर, मिलिंद गवळी, अनंत पणशीकर, प्रदीप कबरे, नीता लाड, अक्षय बदरापुरकर, अक्षय कोठारी आदि मान्यवरांच्या उपस्थितीत १८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

प्रसाद कांबळी प्रस्तुत भद्रकाली प्रोडक्शनच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने महोत्सव प्रारंभ झाला. यासोबतच ‘वेलकम जिंदगी’ (त्रिकूट, मुंबई), ‘अनन्या’ (सुधीर भट थिएटर्स), ‘माकड’ (श्री स्वामी समर्थ आर्टस), ‘अशीही श्यामची आई’ (सुधीर भट थिएटर्स) या नाटकांचे प्रयोग महोत्सवात सादर करण्यात आले. महोत्सवाची सांगता ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाद्वारे झाली.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *