Breaking News

फिल्मीनामा

ग्रामीण ढंगाची प्रेमकथा ‘वंटास’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : प्रतिनिधी एखाद्या विशिष्ट फॅार्ममधील सिनेमा बॅाक्स ऑफिसवर हिट झाला की त्यानंतर त्याच पठडीतील बरेच सिनेमे पाहायला मिळतात. मराठी सिनेमांच्या बॅाक्स ऑफिसवर सध्या ग्रामीण बाजाच्या सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. ‘सैराट’ या सिनेमाने मिळवलेल्या यशानंतर ‘वंटास’ हा आणखी एक ग्रामीण ढंगाच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये …

Read More »

‘राजी’साठी अमृताने पुन्हा गिरवले उर्दूचे धडे पाकिस्तानी शाही कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत दिसणार

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. हिंदी सिनेमांमधील लहान-सहान भूमिकांमध्येही तिने रसिकांची दाद मिळवली आहे. सध्या ती धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या आगामी हिंदी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘राजी’च्या ट्रेलर तसंच …

Read More »

आलिया आणि वरूण बनले नंबर वन स्कोर ट्रेन्ड्स इंडिया लिस्ट रिपोर्ट

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामूळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. कदाचित याच कारणामुळे आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत वरूणने पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होण्याचा मान पटकावला आहे. वरूण अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन बनला आहे, तर तरूणाईवर सध्या अधिराज्य गाजविणारी आलिया भट …

Read More »

नसीरुद्दीन यांच्या सिनेमात सोनाली होप और हम चित्रपटाद्वारे एकत्र

मुंबई : प्रतिनिधी आजवर विविध पुरस्कारांना गवसणी घालण्यात यशस्वी ठरलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच फॅार्मात आहे. दिग्दर्शक प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाने नुकताच सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याने सोनाली पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली आहे. अशातच नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या ‘होप और हम’ या हिंदी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रकाशित …

Read More »

अमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर प.हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांची पत्रकार परिषदेत माहीती

मुंबई : प्रतिनिधी मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृती प्रित्यर्थ मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा आज प्रभुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. ज्येष्ठ पार्श्वगायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर प्रसाद ओक फर्जंद चित्रपटात साकारणार गुप्तहेराची भूमिका

मुंबई : प्रतिनिधी मागच्या आठवड्यात राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि आजवर अभिनेत्याच्या रूपात प्रेक्षकांना मोहिती घालण्यात यशस्वी झालेल्या प्रसाद ओकचं नाव दिग्दर्शक म्हणून गाजू लागलं. प्रसादने प्रथमच स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमासाठी दिला जाणारा पुरस्कार पटकावत आपल्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला. आता लवकरच प्रसाद एका …

Read More »

‘राजा’ उलगडणार गायकरूपी नायकाचा संगीतमय प्रवास २५ मे ला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई : प्रतिनिधी पूर्वीच्या काळी कलागुण अंगी असूनही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागायचा. या संघर्षातून जो तरायचा तोच यशाच्या शिखरावर विराजमान व्हायचा, पण आज जमाना बदलला आहे. आजचा जमाना रिअॅलिटी शोजचा आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आज स्पर्धा जरी वाढली असली तरी स्ट्रगलची पद्धत काहीशी बदलली आहे. असं असलं तरी …

Read More »

रोहित शेट्टीच्या मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू स्कूल कॅालेज आणि लाईफ

मुंबई : प्रतिनिधी धडाकेबाज अॅक्शनपटांसोबतच हलके-फुलके विनोदी सिनेमे बनविण्यासाठीही प्रसिद्ध असलेला निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीही अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकत मराठीकडे वळला आहे. रोहित एका मराठी सिनेमाची निर्मती करणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, पण रणवीर सिंहसोबतच्या ‘सिम्बा’मध्ये व्यग्र असल्याने या सिनेमाचा शुभारंभ करण्यात …

Read More »

विजय चव्हाण आणि मृणाल कुलकर्णीला व्ही.शांताराम पुरस्कार तर धर्मेद्र आणि राजकुमार हिराणी यांना राज कपूर पुरस्कार जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना तर चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली. …

Read More »

‘शिकारी’मध्ये मृण्मयीचं सरप्राइज पॅकेज सामान्य आणि उनाड बुध्दीच्या नायिकेची भूमिका

मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही प्रकारच्या भूमिकेला न्याय देण्याची क्षमता असणाऱ्या मृण्मयीने नेहमीची विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. अभिनयापासून चित्रपट निर्मितीपर्यंतच्या आजवरच्या तिच्या प्रवासावर नजर टाकल्यास सहजपणे याची जाणिव होते. आता पुन्हा एकदा मृण्मयी एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. काहीशा बोल्ड टीझरमुळे अनपेक्षितपणे सर्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या …

Read More »