Breaking News

फिल्मीनामा

टीझरने उलगडला ‘रेडू’चा अर्थ मे महिन्यात मिळणार बघायला

मुंबई : प्रतिनिधी काही सिनेमे अनोख्या शीर्षकांमुळे चर्चेत राहतात आणि उत्सुकताही वाढवतात. शीर्षकाचाच नेमका अर्थ न समजल्याने सिनेमात काय दडलंय याचाही अंदाज येत नाही, पण असे सिनेमे कुतूहल जागविण्यात यशस्वी ठरतात. ‘रेडू’ या आगामी मराठी सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. शीर्षकावरून हा सिनेमा कसा असावा याचा अंदाज लावणं तर …

Read More »

रोहितची म्युझिक अकादमी सुरू लातूरात सुरु केली मर्म म्युजिक अकादमी

मुंबई : प्रतिनिधी रोहित राऊत हे नाव पहिल्यांदा झी मराठी वाहिनीवरील लिटील चॅम्प्स सारेगमपाच्या मंचावर गाजलं. चिमुरड्या गायकांच्या यादीत आपला वेगळा ठसा उमटवत तेव्हापासूनच रोहितने स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं होतं. पार्श्वगायनाकडे वळल्यानंतर रोहितने बऱ्याच मराठी गाण्यांना सूर दिला आहे. याच रोहितने आता म्युझिक अकादमी सुरू केली आहे. रोहित्याच्या या …

Read More »

वादाची लागण ‘हिंदू कोड बील’ ला नाटक सादरीकरणाच्या हक्कावरून वाद

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकिय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात वादांना फार महत्व आहे. मात्र एखाद्या वादामुळे चांगली नाट्यकृतीच बंद होण्याची वेळ आली तर ते सामाजिकदृष्ट्या अतिशय घातक आहे. सध्या मराठी अनुवादीत हिंदू कोड बील या नाटकाच्या सादरीकरणाच्या हक्कावरून असाच वाद निर्माण झाला असून या वादाचा परिणाम या नाट्यकृतीवर होण्याची शक्यता …

Read More »

‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र आले शिवदर्शन-अभिजीत साबळेंचा नातू शिवदर्शन आणि शिवाजी साटमांचा मुलगा अभिजीत पुन्हा एकत्र

मुंबई  : प्रतिनिधी रियल लाईफमध्ये असो वा, रील लाईफमध्ये एखाद्याचे एखाद्याशी सूर जुळले की त्यांची चांगलीच गट्टी जमते. चंदेरी दुनियेतही असे काही दिग्दर्शक कलाकार आहेत त्यांचे सूर इतक्या चांगल्या प्रकारे जुळले आहेत की ते वारंवार एकत्र दिसतात. मराठी सिनेसृष्टीतही अशी बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. शिवदर्शन साबळे आणि अभिजीत साटम हे …

Read More »

स्वानंदीने घेतली स्पृहाची जागा ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकामध्ये उमेश कामतसोबत दिसणार!

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वीच आम्ही एक बातमी दिली होती. त्यात स्पृहा जोशी ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातून बाहेर पडल्याचं म्हटलं होतं. पहिल्या प्रयोगापासून हे नाटक चांगलंच गाजतंय. ठिकठिकाणाहून प्रयोगाची मागणी वाढत आहे. पूर्वी केलेल्या काही कमिटमेंट्समुळे स्पृहाला नाटकाच्या प्रयोगांसाठी धावपळ करणं शक्य होत नसल्याने स्पृहाने ‘डोण्ट वरी बी …

Read More »

ऋषिकेश बनला वेडगावचा शहाणा ‘वाघेऱ्या‘ या अनोखा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : प्रतिनिधी गावरान भूमिकांमध्ये विनोदी रंग भरताना कुठेही लाल मातीचा सुगंध हरवू न देता त्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या ऋषिकेश जोशीने आजवर साकारलेल्या सर्वच भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. प्रेक्षक जेव्हा एखाद्या कलाकाराला सिनेमातील नावाने ओळखू लागतो तेव्हा त्या कलावंताने साकारलेल्या भूमिकेचं चीज झालं असं म्हटलं …

Read More »

खलनायकी भूमिकांकडून नायकी भूमिकांकडे… तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार गणेश यादव

मुंबई : प्रतिनिधी अभिनेते गणेश यादव यांनी आजवर जरी विविधांगी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी साकारलेल्या खलनायकी ढंगातील भूमिकाच जास्त स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या सिनेमातील भ्रष्ट राजकारणी असो, वा खाकी परिधान करूनही अन्यायाला साथ करणारा पोलिस अधिकारी असो… गणेशने नेहमीच आपल्या भूमिकांना …

Read More »

माधुरीने गायले सुमेधच्या अभिनयाचे गोडवे बकेट लिस्टमध्ये माधुरीसोबत दिसणार

मुंबई : प्रतिनिधी अश्विनी भावेंची मुख्य भूमिका असलेल्या ‘मांजा’ या सिनेमात आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर खलनायकी रंग भरणारा एक गोंडस चेहरा दिसला होता. सिनेमाइतकंच या खलनायकी भूमिकेतील या चेहऱ्याचंही सर्वांनी कौतुक केलं. सुमेध मुद्गलकर नावाचा हा अभिनेता आता लवकरच आणखी एका मराठी सिनेमात झळकणार आहे. ‘मांजा’पूर्वी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या राजेश …

Read More »

‘बडुंबा…’मध्ये दिसणार अमिताभ-ऋषी यांची केमिस्ट्री लंबुजी आणि टिंबुजीवरील गाणे नुकतेच चित्रीत

मुंबई : प्रतिनिधी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ‘१०२ नॅाट आऊट’ म्हणत जवळजवळ २७ वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’ या सिनेमामध्ये दोघेही खूप वेगळ्या गेटअपमध्ये आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’च्या शूटनंतर याच सिनेमातील ‘बडुंबा…’ या गाण्याच्या लाँचसाठी …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधूंच्या कादंबरीतील ‘झिपऱ्या’ लवकरच चित्रपटगृहात झळकणार

मुंबई : प्रतिनिधी मराठी साहित्य इतकं प्रगल्भ आणि विपुल आहे. यामुळे काही दिग्दर्शकांना नेहमी मराठी साहित्य खुणावत असतं. त्यामुळेच अशा साहित्यकृतींवर आधारित सिनेमांची निर्मिती होत असते. विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नांव आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ‘झिपऱ्या’ ही त्यानी …

Read More »