Breaking News

फिल्मीनामा

तायक्वांडोमुळे हिमांशू बनला अभिनेता ‘सोबत’ चित्रपटाद्वारे करणार सिनेसृष्टीत पदार्पण

मुंबई : प्रतिनिधी नशीबाचा खेळ कधीच कुणाला कळला नाही. मोठेपणी समाजात ठामपणे उभं राहायचं असेल तर अभ्यास करण्याचा सल्ला सर्वांनाच मिळत असतो. त्या जोडीला आणखी एक पर्याय खुला ठेवण्यासाठी एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवण्याकडेही पालक आणि पाल्यांचा कल असतो. पण इतकं करूनही काहीजण एखाद्या भलत्याच क्षेत्रात नावलौकीक मिळवतात. यात रुपेरी पडद्यावर …

Read More »

शाहरूख खानच्या नंबर वन मुळे अमिताभ बच्चनची ट्वीटरला धमकी स्कोर ट्रेंड्स इंडिया फेसबुक चार्ट्सवर नंबर वन बनलेल्या बिग बींचा ट्विटरला टोला!

मुंबई : प्रतिनिधी महानायक अमिताभ बच्चन फेसबुकवर ३० दशलक्ष फोलोअर्ससह भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले ‘मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ बनले आहेत. बिग बींनी स्कोअर ट्रेड्स इंडियाद्वारे दिलेल्या या माहितीचं समर्थन ट्विटवर केलं आहे. बिग बींच्या एका चाहतीने स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टची आकडेवारी ट्विट केली होती. अमिताभ बच्चन यांनी ती रिट्विट करत …

Read More »

आमीर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार ‘शिवाजी अंडरग्राऊंड’चा ७०० वा प्रयोग ! २१ मे रोजी यशवंतराव नाट्यगृह मध्ये होणार सादर

मुंबई : प्रतिनिधी शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव  नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक …

Read More »

पद्मश्री लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दु:ख

सातारा-मुंबई : प्रतिनिधी मराठी तमाशा क्षेत्राला नवीन आयाम देणार्‍या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वाई येथे खाजगी रुग्णालयात आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …

Read More »

कोकणप्रेमींना ‘रेडू’ नक्कीच आवडेल ! दिग्दर्शक सागर वंजारी यांचं मत

‘रेडू’ असं आगळंवेगळं शीर्षक असलेला मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून चित्रट महोत्सवांपासून पुरस्कार सोहळ्यांपर्यंत सर्वच ठिकाणी कौतुकास पात्र ठरत आहे. या चित्रपटाद्वारे सागर वंजारी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. सागरच्या या पहिल्याच चित्रपटाला राज्य पुरस्कारासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. १८ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या निमित्ताने सागरशी मराठी e-बातम्या …

Read More »

महेश कोठारेंच्या पाणी चित्रपटाचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते शुमारंभ पाणी टंचाई आणि ग्रामीण जीवनाचे विदारक वास्तवाचे दिग्दर्शन आदीनाथ कोठारे करणार

नांदेड : प्रतिनिधी ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाई व ग्रामीण जीवनाची विदारकता दाखविणारा सुप्रसिद्ध सिनेनिर्माता महेश कोठारे निर्मित व आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. हा चित्रपट ग्रामीण जीवनातील विदारक आर्थिक परिस्थिती व पिण्याच्या …

Read More »

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिलेला शुक्रतारा सोडून गेला पहाटे अखेरचा स्वरश्वास घेतला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दशकाहून अधिक काळ आपल्या स्वरावजाने अबालवृध्दांवर शुक्रताऱ्याची मोहिनी घालणारे आणि मराठी स्वरविश्वात शुक्रताऱ्यासारखे अढळस्थान निर्माण करणारे गायक अरूण दाते यांनी आज रविवारी पहाटे सहा वाजता कांजूर मार्ग येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा स्वरश्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते सतत आजारी होते. …

Read More »

‘मस्का’ लावत अभिनेता बनला दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी प्रियदर्शन जाधवची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘सायकल’ हा विविध पुरस्कार सोहळ्यांपासून चित्रपट महोत्सवांपर्यंत गाजलेला सिनेमा कालच प्रदर्शित झाला आहे. अशातच ‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही लाँच करण्यात आला आहे. आजवर कधी छोट्या पडद्यावरील तर कधी मोठ्या पडद्यावरील विविध …

Read More »

टकमक टोकावर बसून दिग्पालने लिहिली सिनेमाची पटकथा सिनेमासाठी जवळजवळ सहा वर्षे संशोधन

मुंबई : संजय घावरे एखादा सिनेमा लिहायचा म्हटला की त्यासाठी त्या पोषक वातावरण गरजेचं असतं असं सर्वच लेखक सांगतात. पटकथेसाठी आवश्यक असणाऱ्या कल्पना विस्तारासाठी काहीजण एकांतात जातात, तर काही गर्दीच्या शहरातही स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतात… काही ध्येयवेडे लेखक-दिग्दर्शक मात्र याला अपवाद ठरतात. या पठडीत मोडणारे लेखक पटकथेसाठी आवश्यक असणारी …

Read More »

‘अष्टवक्र’ दाखवणार व्यवस्था आणि अपराधी यांच्यातील दुष्टचक्र तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी आजवर समाजव्यवस्था आणि राजकारण यावर भाष्य करणारे बरेच सिनेमे बनले आहेत. सद्य परिस्थितीची सत्य घटनांशी सांगड घालून बनलेले असे सिनेमे समाजमनाला आरसा दाखवण्याचं काम करतात आणि समाजामध्ये हळूहळू बदलाची नवी प्रक्रिया सुरू होते. ‘अष्टवक्र’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटचालीतील पुढचं पाऊल ठरणारा आहे. माणसाच्या जडण घडणीत …

Read More »