Breaking News

आनंद राय आणि अनुराग कश्यप प्रथमच एकत्र

लहान शहरांमधील रोमांस आणि आपल्या मातीतील मनोरंजनाच्या थीमवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले फिल्ममेकर आनंद एल. राय आणि प्रयोगनिष्ठ सिनेमा बनवण्यासाठी ओळखला जाणारा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोन्ही दिग्दर्शकांची शैली भिन्न असूनही एकत्र काम करणार असल्याने राय आणि अनुराग एकत्र येणे हीच मोठी बातमी बनली आहे.

साधेपणातूनही रोमांस दाखवणं ही राय यांची खासियत आहे, तर अनुरागचे चित्रपट काहीसे आकलनापलीकडले असतात. राय जितक्या साधेपणाने आपल्या चित्रपटाची रचना करतात तितकीच अनुरागच्या चित्रपटांची मांडणी क्लिष्ट आणि समजण्यास काहीशी कठिण असते. अशा प्रकारची भिन्न शैली असलेले दोन दिग्गज जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता वाढीस लागते. ‘मुक्काबाज’ या आगामी चित्रपटासाठी राय आणि अनुराग एकत्र काम करणार आहेत.

चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही फिल्ममेकर्स लहान शहरांमधील वास्तववादी घटना उत्सुकतावर्धक पद्धतीने पडद्यावर सादर करण्यासाठी ओळखले जातात. उत्तर भारतातील पार्श्वभूमी असणं हाच या दोघांच्या चित्रपटांमधील एक समान धागा आहे. याच कारणामुळे ‘मुक्काबाज’ हा चित्रपट दोन वेगळ्या शैलींचं संगम घडवणारा ठरेल. ईरॉस इंटरनॅशनल आणि आनंद राय यांची प्रस्तुती असलेल्या फँटम फिल्मच्या सहयोगाने बनणाऱ्या कलर यलो प्रोडक्शनच्या ‘मुक्काबाज’चं दिग्दर्शन अनुराग करणार आहे. विनीत कुमार सिंग, झोया हुसैन, जिमी शेरगील आणि रवी किशन आदी कलाकारांचा समावेष असलेला हा सिनेमा पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *