Breaking News

किराया अडवाणी आणि सईद जाफरी यांच्यात आहे खास नाते

कियारा अडवाणी ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हीट चित्रपट तिने दिले आहेत. सोशल मीडियावर तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या मेहनतीच्या बळावर कियाराने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे. गांधी, शतरंंज के खिलाडी यांसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते सईद जाफरी हे कियाराचे आजोबा आहेत.

कियारा अडवाणीची आई ही सईद जाफरीचा भाऊ हमीद यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. अर्थात कियाराचे आजोबा आणि सईद जाफरी हे दोघेही एकमेकांचे भाऊ होते. त्या नात्याने कियारा ही सईद जाफरी यांची नात झाली. सईद जाफरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन आणि रंगमंचावर मोठ्या प्रमाणावर काम केले.

सहा दशकांहून अधिक काळ असलेल्या कारकिर्दीत, सईद जाफरी यांनी १५० हून अधिक ब्रिटिश, भारतीय आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम केले. सर्वाधिक हॉलिवूड चित्रपट करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सईद जाफरीचा हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. इतकेच नाही तर सईद जाफरी हे कॅनेडियन आणि ब्रिटिश पुरस्कारांमध्ये नामांकन मिळवणारे पहिले भारतीय आहेत. ते आज या जगात नाही. पण, आपल्या आपल्या सहज, सदाबहार अभिनयाने ते चाहत्यांच्या आठवणीत आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’ जावेद अख्तर यांचं सूचक विधान

दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश सजला आहे. अशा या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *