Breaking News

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच त्यांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने काही एफडीवरील व्याज १.२५ टक्के वाढवले आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही अलीकडेच एफडीवरील व्याज वाढवले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र एफडीवरील व्याजदर

७ दिवस ते ३० दिवस: सामान्य लोकांसाठी – २.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – २.७५ टक्के
३१ दिवस ते ४५ दिवस: सामान्य लोकांसाठी – ३ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ३ टक्के
४६ दिवस ते ९० दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४.७५ टक्के
९१ दिवस ते ११९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.९० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.४० टक्के
१२० दिवस ते १८० दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.१० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.६० टक्के
१८१ दिवस ते २७० दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६ टक्के
२७१ दिवस ते ३६४ दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.६० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.१० टक्के
३६५ दिवस किंवा एक वर्ष: सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७ टक्के
१ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के
२ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के
३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के
५ वर्षे ते १० वर्षे: सामान्य लोकांसाठी – ६.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के

बँक ऑफ बडोदा एफडी दर

७ दिवस ते १४ दिवस – सामान्य लोकांसाठी: ३.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ३.५० टक्के
१५ दिवस ते ४५ दिवस – सामान्य लोकांसाठी: ३.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ४ टक्के
४६ दिवस ते ९० दिवस – सामान्य लोकांसाठी: ५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ५.५० टक्के
९१ दिवस ते १८० दिवस – सामान्य लोकांसाठी: ५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ५.५० टक्के
१८१ दिवस ते २१० दिवस – सामान्य लोकांसाठी: ५.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६ टक्के
२११ दिवस ते २७० दिवस – सामान्य लोकांसाठी: ६ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६.५० टक्के
२७१ दिवस आणि त्याहून अधिक आणि १ वर्षापेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६.७५ टक्के
१ वर्ष – सामान्य लोकांसाठी: ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.२५ टक्के
१ वर्ष ते ४०० दिवसांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.२५ टक्के
४०० दिवसांपेक्षा जास्त आणि २ वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.२५ टक्के
२ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: ७.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.७५ टक्के
३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५ वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.०० टक्के
५ वर्ष ते १० वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.०० टक्के
१० वर्षांवरील (कोर्ट ऑर्डर योजना) – सामान्य लोकांसाठी: ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६.७५ टक्के
३९९ दिवस (बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट योजना) – सामान्य लोकांसाठी: ७.१६ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.६५ टक्के

कॅनरा बँक एफडीचे नवीन दर

कॅनरा बँक आता ७ ते ४५ दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर ४ टक्के आणि ४६ ते ९० दिवसांच्या दरम्यानच्या ठेवींवर ५.२५ टक्के व्याजदर देत आहे. कॅनरा बँक ९१ ते १७९ दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ५.५० टक्के व्याजदर आणि १८० ते २६९ दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ६.१५ टक्के व्याजदर देत आहे. आता २७० दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर ६.२५ टक्के व्याजदर मिळेल. तर १ वर्षात मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर ६.९० टक्के व्याजदर मिळेल. बँक ४४४ दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर सर्वाधिक ७.२५ टक्के व्याज देत आहे.

कॅनरा बँक एक वर्षापेक्षा जास्त ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ६.८५ टक्के, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या एफडीवर ६.८५ टक्के व्याज दराची हमी देते. बँक आता तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या परंतु पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ६.८० टक्के आणि पाच वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या एफडीवर ६.७० टक्के व्याज देत आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

धनत्रयोदशीला बड्या ज्वेलर्सकडून दागिन्यांवर मोठी सूट

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *