Breaking News

मुळशी पॅटर्न १०० कोटी कमावू शकला असता पण

मराठीतले अनेक सिनेमे हे कोटी रुपये कमावत आहे. २०१६ साली आलेला ‘सैराट’ हा चित्रपट १०० कोटींच्याही पुढे पोहचला होता. र्व रेकोर्ड्स मोडले आहेत. लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चित्रपटांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता या चित्रपटाचा नवा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. यापुर्वी त्यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. प्रवीण तरडे, ओम भुतकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मोहन जोशी यांच्या अभिनयानं या चित्रपटात चार चांद लावले होते. चित्रपटाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगली कामगिरी केली होती. परंतु हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये का जाऊ शकला नाही याचे कारण प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केले होते.

आज प्रवीण तरडे यांचा वाढदिवस आहे. प्रवीण तरडे यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि वेबमालिकांतून कामं केली असून त्यांनी अनेक मालिका-चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांनी प्रसिद्ध युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती. त्यांच्या ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात त्यांनी ‘मुळशी पॅटर्न’च्या कमाईवर भाष्य केले होते. 2018 आलेल्या या चित्रपटानं अल्पावधीतच मोठी कमाई केली होती. परंतु यावर प्रवीण तरडे यांनी आपली खंत व्यक्त केली होती.

ते म्हणाले की, ”सगळ्यांनी ‘मुळशी पॅटर्न’ पाहिला. पुरस्कारही मिळाले. डोक्यावर घेऊन नाचले. पण ज्या दिवशी चित्रपटगृहात तो खूप जोरात चालू होता त्या वेळेस खोडसाळ पत्रकारांनी उगीचच गुन्हेगारीचा चित्रपट, असं कारण नसताना रंगवलं अशी खंत त्यांनी व्यक्त करत थेट पत्रकारांना या;या जबाबदारी धरले असून यापुढे चित्रपटाचे समीक्षण करताना योग्य समीक्षण करा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *