Breaking News

धनुष साकारणार या दिग्गज व्यक्तीवर आधारित बायोपिकमध्ये मुख्य भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते धनुषसाठी मोठ्या प्रकल्पसाठी सज्ज

धनुष’ने अभिनयाच्या जोरावर टॉलीवूड आणि बॉलीवूड मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. धनुष एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट दिग्दर्शक देखील आहे.धनुष हा असा अभिनेता आहे ज्याने साऊथ सिनेमा ते बॉलीवूडमध्ये क्रॉसओव्हर केले आहे. त्याच्या अभिनयामुळे त्याचे बॉलिवूडमध्येही मोठे नाव आहे. आता धनुष त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा पॅन-इंडिया चित्रपट देण्यास सज्ज झाला आहे.

इलैयाराजा यांच्या बायोपिकमध्ये धनुष भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज होईल अशी माहिती आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते धनुषसाठी हा एक मोठा प्रकल्प ठरू शकतो. हा चित्रपट भारतातील एक दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांच्या जीवनावर आधारित असून धनुष मुख्य भूमिकेत आहे.

संपर्क माध्यमांतर्गत हा मोठा प्रकल्प उभारला जात आहे. इलैयाराजा यांचा मुलगा युवन शंकर राजा याने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला धनुषला त्याच्या वडिलांच्या बायोपिकमध्ये पाहायला आवडेल. धनुषच्या करिअरमधला हा पहिला बायोपिक असेल ज्यामध्ये तो एवढ्या मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. वर्षानुवर्षे संगीतात चमकदार कामगिरी करणाऱ्या इलय्याराजा यांनी १ हजाराहून अधिक चित्रपटांसाठी गाणी लिहिली, आणि २० हजाराहून अधिक मैफिली सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

इलैयाराजा यांनी १९७६ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तमिळ चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. महान संगीतकार इलैयाराजा यांना २०१० मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *