Breaking News

‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक

आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी ना केवळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला उलट ते आत्मपरिक्षणासाठी काही काळ देशाबाहेरही गेले. नुकतंच त्यांनी माध्यमांशी दिलेल्या मुलाखतीत ‘आदिपुरुष’च्या वादावर भाष्य केले.

‘आदिपुरुष’चे संवाद लिहिण्यात तुमची चूक झाली का असा प्रश्न विचारला असता मनोज मुंतशीर म्हणाले,’१०० टक्के. यात शंकाच नाही. मी इतका असुरक्षित नाही की माझं लिखाण कौशल्याचा बचाव करत राहीन की मी तर बरोबरच लिहिलं आहे. अरे १०० टक्के माझी चूक झाली आहे. पण जी चूक झाली तेव्हा त्यामागे काहीच वाईट उद्देश्य नव्हता.

सनातन धर्माला ठेच पोहोचवण्याचा किंवा भावना दुखवायचा माझा हेतू अजिबातच नव्हता. मी असं वागण्याचा कधी विचारही करु शकत नाही. माझ्याकडून चूक नक्कीच झाली आहे, मोठी चूक आहे…मी यातून बरंच शिकलो आहे. यापुढे मी काळजी घेईन असे म्हणत त्याने आपली चुका मान्य केली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘मी नेहमीच इंडस्ट्रीसोबत नो दोस्ती-नो दुश्मनी ठेवलं आहे. मी फक्त प्रोजेक्ट आणि कामाशी संबंधित त्यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे ना माझा कोणी मित्र आहे ना वैरी. ना मी पार्ट्यांना जातो ना महफिल जमवतो. माझे जे मित्र आहेत ते इंडस्ट्रीच्या बाहेर आहेत. ते माझे लहानपणीचे आणि कॉलेजचे मित्र आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीतून मला कोण पाठिंबा देतं नाही देत यामुळे मला फरक पडत नाही.’

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *