Breaking News

ओमिक्रॉन इफेक्टमुळे विमान भाडे दुप्पट प्रवासी उद्योगावर परिणाम

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. याशिवाय तीन ते चार देशात याचे रुग्ण आढळल्यानंतर सरकार आवश्यक ती काळजी घेत आहे. पण कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचा परिणाम प्रवासी उद्योगावरही दिसून येतआहे. विमान कंपन्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान भाडे वाढवले आहे. भारतातून US, UK, UAE आणि कॅनडा आदी देशांमध्ये जाण्यासाठी विमान भाडे दुप्पट झाले आहे.

आंतरराष्ट्रीय स्थळी विमानाने प्रवास करणाऱ्यांचा त्रास इथेच संपत नाही. ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वेही मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेमुळे प्रवाशांनाही    विमानतळावर ६ तास प्रतीक्षा करावी लागू शकते.

अनेक मार्गांवर भाडे दुप्पट झाले

दिल्ली ते लंडन फ्लाइट तिकिटांचे दर ६०,००० रुपयांवरून १.५ लाख रुपयांपर्यंत वाढलेआहेत. दिल्ली ते दुबईचे विमान भाडे जवळपास दुप्पट होऊन ३३,००० रुपये झाले आहे.यापूर्वी दिल्ली ते दुबईच्या राउंड ट्रिपचे तिकीट २०,००० रुपये होते. दिल्ली ते अमेरिका या फेरीचा खर्च पूर्वी ९०,००० ते १.२ लाख रुपये इतका होता. त्यात आता वाढ होऊन सुमारे दीड लाख रुपये झाले आहेत.

शिकागो, वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क शहराच्या विमान भाड्यात १००% वाढ झाली आहे. बिझनेस क्लास तिकिटांची किंमत दुपटीने वाढून ६ लाख रुपये झाली आहे. दिल्ली ते टोरंटो विमान भाडे सुमारे ८०,००० रुपयांवरून २.३७ लाख रुपये झाले आहे.

आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

ज्या देशातून ओमिक्रॉन सापडला आहे त्या देशांतून येणाऱ्या हजारो प्रवाशांना दिल्ली विमानतळावर ६ तास थांबावे लागू शकते. वास्तविक, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे, जी १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू  होईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वात, ओमिक्रॉनची प्रकरणे आढळलेल्या १४ हून अधिक देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विमानतळावर कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच या देशांमधून येणारे प्रवासी बाहेर पडू शकतील. विमानतळावर केलेल्या RT-PCR चाचणीचा निकाल यायला ४ ते ६ तास लागतील. चाचणी निकाल येईपर्यंत प्रवाशांना विशेष होल्डिंग एरियामध्ये थांबावे लागेल. मात्र, विमानतळावर किती टेस्टिंग काउंटर उभारले जातील, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *