Breaking News

कोरोना: मुंबई महानगरातील ९ महानगरपालिकांसह ३० जिल्हे मृत्यू मुक्त ३ हजार १८ नवे बाधित, ५ हजार ५७२ बरे झाले तर ६८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरातील ५ महानगरपालिकांच्या हद्दीत काल मृतकांची नोंद झाल्यानंतर आज त्यात वाढ झाली असून तब्बल ९ महापालिकांच्या हद्दीत शून्य मृत्यूची माहिती पुढे आली आहे. तर राज्यातील २१ शहर व जिल्ह्यांमध्येही शुन्य मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून राजधानी असलेल्या मुंबईत मात्र ६ मृतकांची नोंद झाली आहे. राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, भंडारा, वाशिम, बुलढाणा, अकोला शहर-जिल्हा, लातूर शहर-जिल्हा, नांदेड शहर-जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, सांगली-मिरज, कोल्हापूर शहर-जिल्हा, सिंधुदूर्ग, धुळे शहर- जिल्हा, अहमदनगर शहर, मालेगांव शहरात शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे. (तक्ता पाह्यला विसरू नका.)

मागील २४ तासात राज्यात ३०१८ बाधित आढळून आल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या १९ लाख २५ हजार ६६ वर तर अॅक्टीव रूग्णांची संख्या ५४ हजार ५३७ इतकी झाली असून ६८ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ५,५७२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,२०,०२१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४. % एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२६,००,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२५,०६६ (१५.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८९,५६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,२०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५३७ २९२००८ ११०९४
ठाणे ३९ ३९३८१ ९४६
ठाणे मनपा ११८ ५५९६१ १२१७
नवी मुंबई मनपा ६९ ५३१९६ १०७८
कल्याण डोंबवली मनपा ७८ ६०४६५ ९८३
उल्हासनगर मनपा ११२९२ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६४१ ३४५
मीरा भाईंदर मनपा ३० २६७१८ ६४७
पालघर १८ १६३१३ ३१८
१० वसईविरार मनपा ३० ३०३२८ ५९३
११ रायगड १४ ३६७१८ ९२२
१२ पनवेल मनपा ४६ २९४६२ ५६५
ठाणे मंडळ एकूण ९९१ ६५८४८३ १९०५१
१३ नाशिक ८१ ३४८६७ ७२४
१४ नाशिक मनपा २४१ ७५३०० १००२
१५ मालेगाव मनपा ४५७४ १६३
१६ अहमदनगर ६६ ४३७९९ ६५५
१७ अहमदनगर मनपा १७ २५०१७ ३८५
१८ धुळे ८५०० १८९
१९ धुळे मनपा ७१०७ १५५
२० जळगाव ३३ ४३६२४ ११३८
२१ जळगाव मनपा ३३ १२३९८ ३०४
२२ नंदूरबार २१ ८०३८ १६९
नाशिक मंडळ एकूण ५०५ २६३२२४ १० ४८८४
२३ पुणे १५० ८७६४८ २०६५
२४ पुणे मनपा २५१ १९०५८९ ४४०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११२ ९३२३८ १२७३
२६ सोलापूर ५६ ४१३४७ ११७५
२७ सोलापूर मनपा २५ ११८७४ ५८१
२८ सातारा ४८ ५४३९१ १७५५
पुणे मंडळ एकूण ६४२ ४७९०८७ २४ ११२५१
२९ कोल्हापूर ३४७७७ १२५१
३० कोल्हापूर मनपा १४३२९ ४०७
३१ सांगली २६ ३२३५७ ११४८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७४० ६१८
३३ सिंधुदुर्ग २७ ६०११ १५८
३४ रत्नागिरी २० १११६५ ३७६
कोल्हापूर मंडळ एकूण ८६ ११६३७९ ३९५८
३५ औरंगाबाद १५१९३ ३०६
३६ औरंगाबाद मनपा ३९ ३२५९९ ९०१
३७ जालना १६ १२७५१ ३४१
३८ हिंगोली ४१७१ ९६
३९ परभणी ४३२५ १५७
४० परभणी मनपा ३२५६ १२५
औरंगाबाद मंडळ एकूण ६७ ७२२९५ १९२६
४१ लातूर २१ २०७४२ ४६२
४२ लातूर मनपा ३० २४९४ २१८
४३ उस्मानाबाद १० १६८०८ ५३६
४४ बीड ४३ १७००० ५२१
४५ नांदेड १३ ८४६८ ३६७
४६ नांदेड मनपा १७ १२७७२ २८७
लातूर मंडळ एकूण १३४ ७८२८४ २३९१
४७ अकोला ४१०८ १३०
४८ अकोला मनपा १४ ६४०४ २१६
४९ अमरावती २६ ७२२२ १६९
५० अमरावती मनपा ५८ १२६९४ २१२
५१ यवतमाळ ४१ १३६८९ ३९५
५२ बुलढाणा ३९ १३५८५ २१७
५३ वाशिम १२ ६७८८ १४९
अकोला मंडळ एकूण १९४ ६४४९० १४८८
५४ नागपूर २९ १३८१६ ६७८
५५ नागपूर मनपा २२५ ११०७१६ २५१९
५६ वर्धा २० ९४११ २६५
५७ भंडारा ४२ १२६०६ २६३
५८ गोंदिया २३ १३७७८ १५५
५९ चंद्रपूर २२ १४४३० २२९
६० चंद्रपूर मनपा २१ ८७५४ १५९
६१ गडचिरोली १७ ८४५८ ८७
नागपूर एकूण ३९९ १९१९६९ ४३५५
इतर राज्ये /देश ८५५ ६९
एकूण ३०१८ १९२५०६६ ६८ ४९३७३

आज नोंद झालेल्या एकूण ६८ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३  मृत्यू पुणे-६, अमरावती-३, परभणी-२, औरंगाबाद-१, आणि रत्नागिरी- १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९२००८ २७१११७ ११०९४ ८५७ ८९४०
ठाणे २५३६५४ २३७७३५ ५५५९ ५९ १०३०१
पालघर ४६६४१ ४५४०८ ९११ १७ ३०५
रायगड ६६१८० ६४१९९ १४८७ ४८७
रत्नागिरी १११६५ १०३६४ ३७६ ४२३
सिंधुदुर्ग ६०११ ५५२० १५८ ३३२
पुणे ३७१४७५ ३४९७८० ७७४० ३५ १३९२०
सातारा ५४३९१ ५१७८१ १७५५ १० ८४५
सांगली ५००९७ ४७९९८ १७६६ ३३०
१० कोल्हापूर ४९१०६ ४६९५१ १६५८ ४९४
११ सोलापूर ५३२२१ ५०४८१ १७५६ १४ ९७०
१२ नाशिक ११४७४१ ११०७८५ १८८९ २०६६
१३ अहमदनगर ६८८१६ ६६१६७ १०४० १६०८
१४ जळगाव ५६०२२ ५४०१८ १४४२ २० ५४२
१५ नंदूरबार ८०३८ ७४४७ १६९ ४२१
१६ धुळे १५६०७ १५०२९ ३४४ २३१
१७ औरंगाबाद ४७७९२ ४५६२३ १२०७ १५ ९४७
१८ जालना १२७५१ १२२०३ ३४१ २०६
१९ बीड १७००० १६१८७ ५२१ २८५
२० लातूर २३२३६ २२१३५ ६८० ४१७
२१ परभणी ७५८१ ७१४३ २८२ ११ १४५
२२ हिंगोली ४१७१ ३९८४ ९६ ९१
२३ नांदेड २१२४० २०१४३ ६५४ ४३८
२४ उस्मानाबाद १६८०८ १६०७७ ५३६ १९३
२५ अमरावती १९९१६ १९०१९ ३८१ ५१४
२६ अकोला १०५१२ ९८४० ३४६ ३२१
२७ वाशिम ६७८८ ६३८९ १४९ २४८
२८ बुलढाणा १३५८५ १२६७२ २१७ ६९०
२९ यवतमाळ १३६८९ १२९३३ ३९५ ३५७
३० नागपूर १२४५३२ ११६७८५ ३१९७ १७ ४५३३
३१ वर्धा ९४११ ८८२३ २६५ ३१९
३२ भंडारा १२६०६ ११८९७ २६३ ४४४
३३ गोंदिया १३७७८ १३१९९ १५५ ४१८
३४ चंद्रपूर २३१८४ २१९८५ ३८८ ८१०
३५ गडचिरोली ८४५८ ८२०४ ८७ १६१
  इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
  एकूण १९२५०६६ १८२००२१ ४९३७३ ११३५ ५४५३७

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *