Breaking News

कृषी

सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश राजुरा तालुक्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर तातडीने दिले होते स्थानिक यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश

अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या, आणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त केले; या शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले;  मुनगंटीवार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा प्रत्यक्ष शेतावर भेटू देवून जाणून घेतली: या बाबताची …

Read More »

पीक विमा कंपन्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, संवेदनशीलपणे मदत करा कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री दादाजी भुसे, अनिल पाटील

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांना दिले. वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन …

Read More »

कांदा प्रश्नी अनेकांचे आवाज मात्र बैठकीला फक्त सत्तार, गोयल आणि पवार कांदा उत्पादन, खरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही केंद्रीय वाणिज्य मंत्री, पियुष गोयल

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्यातीसाठी अतिरिक्त ४० टक्के शुल्क भरावे लागत आहे. मात्र देशांतर्गत आणि महाराष्ट्रात कांदा उत्पादनाचे दर पडलेले असल्याने शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्यातील भाजपाप्रणित सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारेमाप आश्वासन दिले. मात्र आज केंद्रीय …

Read More »

हरित क्रांतीचे प्रणेते डॉ एम एस स्वामीनाथन यांचे निधन देशाला अन्नधान्यात स्वावलंबी बनविणारे स्वामीनाथन यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतात १९७२ चा दुष्काळ पडल्यानंतर देशावर अमेरिकेहून आयात केलेल्या गव्हाच्या धान्यावर गुजराण करण्याची परिस्थिती येऊन ठेपली होती. त्यावेळी देशातील पारंपारीक पीक पध्दतीत अनुलाग्र बदल घडवित शेतकऱ्यांची शेती उत्पादन कसे वाढेल या दृष्टीने देशात सुरु केलेल्या पहिल्या हरित क्रांतीचे सरसेनापती डॉ एम एस स्वामीनाथन आणि मुख्य नॉर्मन बरलॉग यांच्या प्रयत्नातून देशात …

Read More »

दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

दिवेआगार ता.श्रीवर्धन, जि. रायगड येथील सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता देऊन यासाठी ५ कोटी ६४ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालयात आज दिवेआगार ता.श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, गिरणे, ता.तळा येथे खार भूमी संशोधन केंद्र आणि किल्ला, ता.रोहा येथील काढणी …

Read More »

कांद्याचा वांदा वाढलाः अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही बैठक पार पडली पण निर्णय झाला नाही

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दूरध्वनी केला. पियुष गोयल यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देत आजच संध्याकाळी (२६ सप्टेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, …

Read More »

जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित

राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा …

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन …

Read More »

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार दुहेरी भेट किसान कर्ज पोर्टल सुरू

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ‘किसान कर्ज पोर्टल’ सुरू केले आहे. हे पोर्टल किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत अनुदानित कर्ज मिळविण्यात मदत करेल. यानंतर शेतकऱ्यांना कर्ज वाटप, व्याज आणि या योजनेची सर्व माहिती मिळेल. यापूर्वी ही सुविधा पोर्टलवर …

Read More »

राळा पीकाची लागवड कशी करावी आणि त्याची काळजी कशी घ्यावीः जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपारिक महत्त्व असते. या महिन्यात धार्मिक कार्य केले जातात. यासाठी ‘राळा’ अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राळा या तृणधान्याला महत्त्च आहे. ‘राळा’ …

Read More »