Breaking News

वर्ष २०१७ मध्ये सेन्सेक्सने नोंदवली २८ टक्क्यांनी वाढ २६ हजारावर असलेला निर्देशांक वर्षअखेर ३४ हजारावर

मुंबईः नवनाथ भोसले

वर्ष २०१७ हे शेअर बाजारासाठी खूपच चांगले राहिले आहे. या वर्षी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांने प्रथमच ३४ हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १० हजार ५०० च्या वर पोहोचला.

सेन्सेक्स १ जानेवारी२०१७ या दिवशी २६ हजार ५९५.४५ अंकांवर होता. तर २७ डिसेंबर २०१७ ला सेन्सेक्स ३४ हजार १२३.१४ अंकांच्या उच्चांकी स्थानावर गेला. निफ्टीही आतापर्यंतच्या १०  हजार ५५२.४० अंकाच्या आतापर्य़ंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. या एका वर्षात सेन्सेक्सने २८ टक्क्यांची तर निफ्टीनेही २८.६५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. बाजारातील काही नोंदणीकृत कंपन्यांनी तर सरत्या वर्षात तब्बल ३३०० टक्क्यांचा परतावा (रिटर्न) भागधारकांना दिला आहे.

वर्ष २०१७ मध्ये शेअर बाजार विक्रमी पातळीवर पोचण्याची अनेक कारणे आहेत. जागतिक शेअर बाजारातील तेजीने देशातील शेअर बाजारातही तेजी राहिली. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबूती, चांगला पाऊस, उभरत्या बाजारांमध्ये भारताची चांगली कामगिरी, परकीय गुंतवणूक संस्थांची वाढलेली गुंतवणूक  आदी घटकांमुळे शेअर बाजाराला बळ मिळाल्याने शेअर बाजारात २८ टक्क्याने वाढ नोंदविली आहे.

 

२०१७ मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेले शेअर्स

1) KIOCL Ltd.  परतावा – ३३८५ %

वर्ष २०१७ मध्ये सरकारी कंपनी कुद्रेमुख आयरन लि. (केआयओसीएल) या कंपनीने सर्वात जास्त परतावा दिला अाहे. केआयओसीएलच्या शेअर्सने २०१७ मध्ये तब्बल ३३८५.७१  टक्के परतावा दिला आहे. या कंपनीमध्ये सरकारची ९९ टक्के हिस्सेदारी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २.३५  कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीची निव्वळ विक्री ४५१.३७ कोटी रुपये राहिली आहे. ३१ डिसेंबर २०१६ या या कंपनीच्या शेअर्सचा भाव ११.५५ रुपये होता. हा भाव २६  डिसेंबरला २०१७ ला ४०२.६० रुपयांवर पोहोचला.

2) HEG Ltd.  परतावा – १३०५ %

ग्रेफाइट इलेक्ट्रोड्स बनवणारी देशातील अग्रणी कंपनी HEG Ltd (एचईजी) च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या वर्षी या शेअर्सने १३०५  टक्क्यांचा परतावा दिला आहे. एचईजीकडे  ग्रेफाइट इलेक्ट्रोड्स बनवण्याचा जगातील सर्वात मोठा प्लँट आहे. कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता ८० हजार टन आहे. चीनध्ये पर्यावरण विषयक वादामुळे काही स्टील आणि इलेक्ट्रोड बनवणार्या कंपन्या बंद पडल्या आहेत. त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना झाला आहे.  एचईजी शेअर्सचा भाव ३१  डिसेंबर २०१६ ला १४९.२५ रुपये होता. हा भाव आता २१८६ रुपये आहे.

3) इंडियाबुल्स वेंचर्स परतावा – १२७ %

इंडियाबुल्‍स वेंचर्स सिक्‍युरिटीज, कमोडिटीज आणि करन्सी ब्रोकिंग सेवा देणारी अग्रणी कंपनी आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्सची किमत १२६२ टक्क्यांनी वाढली आहे. ३०  डिसेंबर २०१६ ला या शेअर्सचा भाव १९.४० रुपये होता. तो आता २६७  रुपयांवर गेला आहे.

4) Weizmann Forex. परतावा – ७६३ %

डिमांड ड्राफ्ट, विमा, म्युचुअल फंड, सोने आणि  मनी ट्रान्सफर सेवा देणार्य़ा या कंपनीच्या शेअर्सने २०१७  मध्ये ८  पट परतावा दिला आहे. २०  डिसेंबर २०१६  ला असलेला शेअर्सचा दर १७०.७५ रुपयांवरून वाढून १४७४.८०  रुपयांवर गेला आहे.

5) रेन इंडस्ट्रीज.  परतावा – ५५९ %

रेन इंडस्ट्रीज मुख्यत: कार्बन प्रोडक्ट्सचे उत्पादन आणि विक्री करते. त्याचबरोबर कंपनी केमिकल्स आणि सिमेंटचाही व्यवसाय करते. कंपनीच्या शेअर्सने २०१७  मध्ये ५  पट परतावा दिला आहे. ३० डिसेंबर २०१६ ला कंपनीच्या शेअर्सचा भाव ५४.९० रुपये होता. शेअर्सचा दर ५५९ टक्क्यांनी वाढून ३६१.८० रुपयांवर गेला आहे.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *