Breaking News

Editor

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे …

Read More »

ऑलिम्पिंक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग यांचा भाजपात प्रवेश

भाजपामध्ये सामील होण्याच्या एक दिवस आधी, बॉक्सिंगमध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते विजेंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एक ट्विट पुन्हा पोस्ट केले होते. तथापि, बॉक्सरने जहाजातून उडी मारल्यानंतर त्याचे अलीकडील रिट्विट्स हटवले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व वाटचालीत, विजेंदर सिंग यांनी बुधवारी नवी …

Read More »

महायुतीतील शिंदे गटावर जाहिर केलेल्या उमेदवारांची नावे घेतली मागे

महायुतीतील भाजपाच्या वरचष्म्यामुळे शिवसेना शिंदे गटाने जाहिर केलेल्या चार उमेदवारांची नावे मागे घेण्याची पाळी शिंदे गटावर आली आहे. आधीच शिवसेना शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांची नावे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी जाहिर करण्यावर भाजपाचा आक्षेप होता. तसेच काही उमेदवार पराभूत होणार असल्याचा अहवाल भाजपाच्या हाती होता. त्यामुळे विद्यमान खासदारांना पर्यायी नावांचा प्रस्ताव …

Read More »

देशात पहिला व्यावसायिक कच्च्या तेलाच्या साठ्यासाठी स्टोरेज उभारणार

जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार म्हणून भारताचा नंबर लागतो. कोणत्याही व्यत्ययाविरूद्ध देशातील जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा परिणाम किंमतीवर होवू नये यासाठी म्हणून साठा वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कच्च्या तेलाचा पहिला व्यावसायिक स्टोरेज तयार करण्याची योजना आयएसपीआरएल या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कंपनीकडून आखण्यात …

Read More »

कायदे धाब्यावर बसवून नितीन गडकरी व भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर

भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊ नितीन गडकरी व …

Read More »

निवडणूक आयोगाची शिवसेना शिंदे गटाला आणि भाजपाला कायदा उल्लंघनप्रकरणी नोटीस

देशातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला आता हळू हळू चांगलाच तापत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्रातील सर्वच सत्ताधारी आणि विरोधी राजकिय पक्षांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या स्टार प्रचारकांची एक यादी जाहिर केली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने जाहिर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवर हरकत घेत तशी तक्रार राज्याच्या केंद्रीय निवडणूक …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, ५ न्याय २५ गॅरंटींचा राज्यात घरोघरी जाऊन प्रचार

खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना न्याय देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला, यातूनच काँग्रेस पक्षाने ५ न्याय व २५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. महिला, युवा, कामगार, शेतकरी, हिस्सेदारी न्याय असा संकल्प जाहीर …

Read More »

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही

सध्या देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. देशाच्या राज्यघटनेवर होत असलेला हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत. प्रकाश आंबेडकर आणि माझे आजोबा यांच्यातील वैचारिक ऋणानुबंधाच्या नात्यामुळे आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली होती. परंतु आज प्रकाश आंबेडकर काहीही बोलत असले तरी मी त्यांच्या वक्तव्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करणार …

Read More »

राज्यपालांचे तत्कालीन सचिव संतोष कुमार करत आहेत २० लाखांच्या दंड माफीसाठी आटापिटा

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे एकेकाळी प्रधान सचिव असलेले संतोष कुमार यांनी बदली झाल्यानंतर अतिरिक्त वेळ ते राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. राजभवनाने २० लाखांचा दंड भरण्यासाठी काढलेल्या नोटीसनंतर तो दंड माफ करण्यासाठी संतोष कुमार आटापिटा करत आहे. संतोष कुमार यांनी दंडनीय दराने अनुज्ञाप्ती शुल्क माफ करण्यासाठी केलेल्या विनंतीवर कार्यवाही सुरु …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण, हातकणंगले, पालघर आणि जळगांवमधून उमेदवार जाहिर

जळगांव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून भाजपाने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे नाराज झालेले खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपाला सोडून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाची खासदारकी सोडून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्या बद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे …

Read More »