Breaking News

Editor

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

राज्य मंत्रिमंडळाने आज (११ मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली. पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना …

Read More »

क्रिस्प व एनएसडीसी संस्था आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागात सामंजस्य करार

नवनवीन कौशल्ये आणि भारतीय मूल्ये, पाठांतर करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाने शिक्षण घेतले तर माणूस समृद्ध होतो. तरुणांना वर्गखोल्यातून बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना थेट समाज प्रवाहाशी जोडून घेणे गरजेचे आहे. यासाठी बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांना जोडून ‘इंटर्नशिप’ हा उपक्रम सुरू करण्यात येत असून, शासकीय विभागांमध्ये विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हास्तरावर इंटर्नशिप करता येईल. यासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च …

Read More »

नवनगर विकास प्राधिकरणाद्वारे संपादित जमिनीच्या मोबदल्यात ६.२५ टक्के परतावा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आपल्या स्थापनेपासून (१४ मार्च १९७३ ते ३१ डिसेंबर १९८३ या कालावधीत) ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्राधिकरणाकरिता संपादित केल्या होत्या, अशा संपादित जमिनींकरीता संबंधित जमीन मालकांना ६.२५ टक्के प्रमाणे जमीन परतावा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या (११ मार्च) बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड प्राधिकारण …

Read More »

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, ईडीच्या कारवाईत भाजपाचा नेता…

ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष असून त्यांच्यामार्फत विरोधकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमधून केला. शरद पवार म्हणाले की, या देशातील केंद्रीय यंत्रणांचा वापर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या …

Read More »

भारत जोडो न्याय यात्रेचा उद्या १२ मार्च रोजी नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला …

Read More »

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणाची माहिती एसबीआयने उद्या संध्याकाळपर्यंत जमा करा

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापेक्षा अधिकचा कालावधी मागणारी एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. विशेष म्हणजे १२ मार्च २०२४ रोजी पर्यंत हे सर्व माहिती गोळा करावी असे आदेश देत १५ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी असलेली सर्व …

Read More »

मुक्त व्यापार करारामुळे युरोपियन देशातील या वस्तू भारतात स्वस्त सर्व चॉकलेट्स, स्वीस घडाळे सोने आदी सह अनेक वस्तू

चार देशांच्या युरोपियन मुक्त व्यापार असोसिएशन (EFTA) सोबत झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराचा (TEPA) भाग म्हणून नवी दिल्लीने ऑफर केलेल्या ड्युटी सवलतीमुळे भारतातील जगप्रसिद्ध स्विस घड्याळे आणि चॉकलेटसाठी कमी पैसे द्यावे लागणार आहेत. कराराचा एक भाग म्हणून, भारत चॉकलेट्स आणि मनगटावरील तसेच स्वित्झर्लंडमधून उगम पावणाऱ्या पॉकेट घड्याळांवरील मूलभूत सीमाशुल्क …

Read More »

भारतीय रिझर्व्ह बँक आता थर्ड पार्टी सेवा देणाऱ्या कार्ड कंपनी कारवाई करणार अनेक कार्ड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

व्हिसा ला काही व्यावसायिक व्यवसाय-ते-व्यवसाय (B2B) क्रेडिट कार्ड व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँक आता थर्ड पार्टी सेवा प्रदात्यांद्वारे केलेल्या पीअर-टू-पीअर (P2P) क्रेडिट कार्ड पेमेंटवर कडक कारवाई करताना दिसत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. किरकोळ ग्राहक थर्ड पार्टी ॲप्सद्वारे भाडे आणि शिक्षण शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असल्याच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे’ उद्घाटन

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत उभारण्यात आलेला मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष हे कायद्यातील नवीन संहितेला अनुसरून असलेले देशातील पहिले आयुक्तालय आहे. राज्यातील जनतेचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास वाढावा यासाठी आगामी काळात राज्यातील सर्व पोलीस घटकात हे कक्ष तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पनवेल तालुका पोलीस …

Read More »

आमदार रविंद्र वायकर शिंदे गटातः मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्याचे स्पष्टोक्ती

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटातील उर्वरित आमदार खासदारांना शिंदे गटात ओढण्याचे काम भाजपाच्या त्या यंत्रणांच्या मार्फत सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. त्या अनुषंगाने ठाकरे गटाचे निष्ठावान आमदार असलेले रविंद्र वायकर यांनी त्यांच्या कथित हॉटेलवर पडलेल्या ईडी आणि पोलिसांच्या पडलेल्या धाडींना कंटाळून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेतृत्वाखालील गटात …

Read More »