Breaking News

Editor

भाजपाचा इशारा संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा, अन्यथा संयम सुटेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

. संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

काँग्रेस नेते थोरात यांचा सवाल, हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? सीमा भागातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी

सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच …

Read More »

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी

राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. …

Read More »

काँग्रेसकडून १९ किलोमीटर पदयात्रा काढून महामानवाला अभिवादन राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेतः बाळासाहेब थोरात

राहुल गांधी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालत आहेत. बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठीच राहुलजींनी साडे तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढली आहे व देशातील जनतेचा या यात्रेला मोठा पाठिंबा मिळत आहे असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महापरिनिर्वाण …

Read More »

धारावीचे टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळाल्याने सीमावाद घडवून आणला का? शरद पवारांची भूमिका स्पष्ट अदानीला पुर्नविकासाचे टेंडरवरून साधला भाजपावर निशाणा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर अनेक दिवस चर्चेत नसलेला सीमावादाचा भाजपाच्या कर्नाटकातील मुद्दा अचानक पुढे आणला जात आहे. त्यातच या सीमावादाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध जोडला जात आहे. एका विशिष्ट व्यक्तीला हे टेंडर मिळावं आणि त्याला विरोध होऊ नये म्हणून हा वाद पुढे आणला …

Read More »

सीमावादावर भाजपा म्हणते, सत्तेत असताना शांत बसणा-यांना कंठ कसा फुटला? सीमाप्रश्नावरून भाजपाचा ठाकरेंना सवाल

जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात आला अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प, मात्र शरद पवारांचा इशाराः ४८ तास नाही, तर कर्नाटकात येतो महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर शरद पवार यांनी दिला इशारा

मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटकचा दौरा रद्द केला. त्यातच आज बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …

Read More »

लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू; हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू १०० टक्के लसीकरण होऊनही लम्पी रोगाची लागण सुरुच- नाना पटोले

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. लम्पी रोगाची लागण वाढत असताना राज्य सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का …

Read More »

कर्नाटकातील हल्ल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, पंतप्रधान आणि अमित शाहच्या कानी घालणार महाराष्ट्र सांम्यजसाची भूमिका घेतेय

कर्नाटकच्या आगळीकीनंतरही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटकबाबत चकार शब्द काढला जात नाही. आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतरही किमान कर्नाटकला इशारा देण्याचे सोडाच उलट शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचे वक्तव्य करत आपली चमडी बचावू भूमिका दाखविली आहे. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे ग्वाही, कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार देणार कोकण महोत्सवात दिले आश्वासन

“कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी …

Read More »