Breaking News

Editor

आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठ सलग चवथ्या वर्षी प्रथम आविष्कार संशोधन स्पर्धेत मिळविला पहिला क्रमांक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे १२ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पार पडलेल्या १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ७९ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करून १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई करत आविष्कार संशोधन स्पर्धेवर …

Read More »

अजित पवार सरकारला म्हणाले, …मुजोर बँकांना कडक शब्दात समज द्या शासन आदेश धुडकावत पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ची सक्ती

राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज देताना ‘सीबील’ स्कोअर पाहिला जाणार नसल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. त्याबाबत शासनाने आदेश …

Read More »

नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, नागपूरची जागा काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा शुभांगी पाटील यांना

नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआ उमेदवार शुभांगी पाटील असल्याचं जाहीर करत नाशिकची …

Read More »

संजय राऊतांचे सूचक विधान, प्रत्येकवेळी शिवसेना त्याग करणार नाही, मात्र विस्कळीतपणा… सेना नेत्यांच्या बैठकीनंतर दिली माहिती

विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांच्या उमेदवारीवरून विसंवाद असल्याचे दिसून आले. मात्र नाशिकमधील भाजपाच्या माजी नेत्या तथा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने घेतली असून नाशिकच्या बदल्यात नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा …

Read More »

MPSC प्रश्नी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन अन चंद्रकांत पाटलांवर निशाणा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील मोदी बागेतील घरी झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक …

Read More »

देशातील सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स महाराष्ट्रात विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण ८८ हजार १३६ स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक १६ हजार …

Read More »

संक्रातीच्या आदित्य ठाकरेंनी ट्विट करत दिल्या खोचक शब्दातून शिंदे-फडणवीसांना शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्र हिताचं बोला

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेल्या मुंबईतील सिमेंट रस्त्याच्या निविदेतील घोटाळा उघडकीस आणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आज नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख टिल्ल्या करत चौकशी सुरु झाल्यानंतर टिल्ल्या शांत बसल्याची टोला लगावला. परंतु आदित्य ठाकरे यांनी मकर संक्रातीनिमित्त आज ट्विटरवरून …

Read More »

शरद पवार यांनी सत्कार केल्यानंतर शिवराज राक्षेकडून व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा पहिल्यांदाच गैरहजर राहिल्याचे कारणही स्पष्ट केले

पुणे येथे काल ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेला पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अनुपस्थित होते. आजवर अनेकदा स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहत असत. यावेळी महाराष्ट्र केसरीच्या आयोजनात आणि निमंत्रित मान्यवरांमध्ये भाजपातील नेतेच दिसत होते. आज शरद …

Read More »

अखेर काँग्रेसने केली तांबेवर कारवाई डॉ. सुधीर तांबे यांना केले निलंबित

विधान परिषद निवडणूकीसाठी पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे नाव पक्षाकडून निश्चित केलेले असतानाही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काची जागा सोडावी लागली. यापार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय नाट्याची तक्रार प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट, गडकरींसाठी आलेला तो फोन बेळगांवच्या जेलमधून नागपूर पोलिस गेले कर्नाटकात

काल शनिवारी सकाळी अर्ध्या तासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या नावाने १०० कोटी रूपये द्या अन्यथा घर आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट उडवून देण्याची धमकी देणारा फोन करण्यात आला. त्यामुळे राज्यासह पोलिस दलात एकच खळबळ माजली. याबाबत राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते …

Read More »