Breaking News

Editor

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, दादा, कार्यकर्ते ठेकेदारांसाठी सर्वपक्षिय बैठक घ्यावी लागेल अजित पवार यांना उद्देशून वक्तव्य करत नवे पोर्टल बनविणार असल्याची माहिती

विधानसभेचे नियोजित कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. यावेळी भिवंडी-पालघर दरम्यानच्या खराब रस्त्याचा प्रश्न भाजपाच्या आमदारांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र रस्त्याची कामे देताना कार्यकर्त्ये ठेकेदार आणि मोठ्या कंत्राटदारांना कशी दिली जातात याची एकप्रकारे गौप्यस्फोटच भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला. यावेळी भिवंडी-पालघर रस्त्याचा …

Read More »

अजित पवारांनी सभागृहातच दिला भाजपा आमदारांना इशारा, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार भरतशेठ गोगावले कधी घालणार कोट पॅट

विधानसभेत आज २९३ वरील प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा नेत्यांच्या अनेक वक्तव्यावरून पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच इशारा दिला. तर शिंदे गटातील आमदारांच्या टोप्याही उठवित रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात सर्व आमदारांना आवाहन केले. विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, मध्यंतरी काही जण बारामतीत आले होते. अलीकडे सप्टेंबर …

Read More »

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी मुख्यमंत्री शिंदेनी केल्या ‘या’ घोषणा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश, महात्मा फुले जन आरोग्य योजनाही लागू

कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत माहिती

राज्यातील ३३ जिल्ह्यात एक लाख ७८ हजार ७२ गोवर्गीय जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत १०० टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात …

Read More »

रूग्णालयातून बाळासाहेब थोरात यांनी मांडली अब्दुल सत्तारप्रकरणी सत्यता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले आरोप खोटे व दिशाभूल करणारे

राज्याचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भूखंड वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत दोषी ठरविले. त्यावरून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासागहेब थोरात यांच्यावर आरोप केले. सध्या दुखापतीमुळे मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयातून विखे-पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर …

Read More »

वाचा, कर्नाटकच्या विरोधात मुख्यमंत्री शिंदेनी मांडलेला ठराव आहे तसा कर्नाटकाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा निषेधाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेला ठराव विधीमंडळात एकमताने मंजूर

कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावातील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. सीमा …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्ल जशी आग ओकली त्याला प्रतिउत्तरच नाही भारतीय जनता पक्षाची भूमिका सीमाप्रश्नीही नेहमीप्रमाणे संदिग्धच-नाना पटोले

सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या गाड्या फोडल्या. महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतरही कर्नाटकाने कुरापती थांबवल्या नाहीत. महाराष्ट्रातील मंत्री सीमाभागात जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती असताना सभागृहात ठराव मांडताना कर्नाटक सरकारला खडेबोल सुनवायला पाहिजे होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्दल ज्याप्रमाणे आग ओकली, …

Read More »

मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सफाई कामगार, आणि अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. त्यांना सोयी सुविधा टप्प्याटप्प्याने लागू करण्याबाबत अधिवेशनानंतर एक बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले. मुंबई मनपाच्या शाळा तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर …

Read More »

अजित पवारांनी सुनावले, ठरावात त्या पाच शहरांचा उल्लेख नाही, व्याकरणात चुका… बेळगाव, कारवार, निपाणीसह असा उल्लेख ठरावात करावा ;ठरावातील चूक अजित पवारांनी आणली निदर्शनास...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये ८६५ गावांचा उल्लेख केला. मात्र त्या ठरावामध्ये बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या शहरांसह सर्व गावांचा उल्लेख का केला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या पाच शहरांसह सर्व गावांचा उल्लेख ठरावात करावा असे सांगत ठरावात असलेली चूक …

Read More »

ठाणे जिल्ह्यातील विविध भूसंपादनात प्रांत उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

ठाणे जिल्ह्यात समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई-बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांचे काम सूरु आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या प्रांत उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करून चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ठाणे …

Read More »