Breaking News

Editor

दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी दूध भुकटीला ३ रूपयाचे अनुदान राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पदुम मंत्री महादेव जानकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली. या निर्णयामुळे दूध उत्पादकांच्या दुधाला निश्चितपणे योग्य दर मिळेल, असा विश्वासही …

Read More »

काँग्रेसला “हात” दाखवित राजेंद्र गावितांनी गळ्यात घातली “कमळ” ची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदीयाच्या रिक्त झालेल्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राज्यात राजकिय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. यातील पालघर येथील लोकसभेच्या जागेसाठी भाजपला उमेदवार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शोधाशोध सुरु असतानाच काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. तर गावीत यांनीही काँग्रेसमध्येच …

Read More »

पंकजा मुंडे यांच्याकडून रमेश कराड यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाचे गाजर विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादीच्या कराडांची माघार

बीड-मुंबई : प्रतिनिधी लातूर विधान परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांच्या माईर या संस्थेच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासंदर्भात दबाव आणत महामंडळाचे अध्यक्षपदाचे आश्वासन महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्यात सुरु झाली आहे. मात्र या …

Read More »

दूधप्रश्नी सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मागण्यांवर ठाम

मुंबई : प्रतिनिधी दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले …

Read More »

शिवसेनेचे नाणार विषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडून थंड बसत्यात नाणारसाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याबाबत अद्याप प्रक्रियाच नाही

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमिका जाहीरपणे घेत हा प्रकल्प गेल्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारमधील शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करत त्याविषयीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मात्र …

Read More »

डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न साठे यांचे साहित्य संकेतस्थळावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे आता संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन …

Read More »

पुनर्वसित व्यक्तींना निर्बंधमुक्त सवलती द्याव्यात लोकशाही दिनात मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध प्रकल्पातील पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मंत्रालयात झालेल्या १०७ व्या लोकशाही दिनात वर्धा येथील प्रकल्पग्रस्ताच्या तक्रारीवर सुनावणी करताना मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात एकाही विकास कामांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल नको कर्जातील निधी व्यतीरिक्त वाढीव रकमेचा बोजाही राज्याच्या तिजोरीवर पडणार

मुंबई : गिरिराज सावंत राज्याच्या डोक्यावर तब्बल ४ लाख १३ हजार कोटी रूपयांचे कर्ज असतानाच आणखी ३ लाख ४१ हजार कोटी रूपयांचे कर्ज काढून ठिकठिकाणी विकास कामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या एकाही विकास कामाचा अर्थात पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल अर्थात फायनान्शियल व्हायबल रिपोर्ट …

Read More »

राज्यातील विविध विभागाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यातच सर्वाधिक खर्च एप्रिल अखेर ८९ टक्के खर्च

मुंबई : प्रतिनिधी राज्याला गतीमान सरकार देण्याचा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजपनेही विविध विकास कामांवर वर्ष अखेरीसच खर्च करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बहुतांष विभागांकडून फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातच विकास कामांवर खर्च केल्याचे दिसून येत असून या शेवटच्या तीन महिन्यात जवळपास अर्थसंकल्पिय तरतूदीच्या ४५ टक्के रक्कम …

Read More »

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिलेला शुक्रतारा सोडून गेला पहाटे अखेरचा स्वरश्वास घेतला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दशकाहून अधिक काळ आपल्या स्वरावजाने अबालवृध्दांवर शुक्रताऱ्याची मोहिनी घालणारे आणि मराठी स्वरविश्वात शुक्रताऱ्यासारखे अढळस्थान निर्माण करणारे गायक अरूण दाते यांनी आज रविवारी पहाटे सहा वाजता कांजूर मार्ग येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा स्वरश्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते सतत आजारी होते. …

Read More »