Breaking News

कृषी

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. …

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार मदतः पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णयः शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मान्यता

शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणे वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ राज्यातील ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना होईल. …

Read More »

पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांची ग्वाही, अंडी समन्वय समितीची स्थापना करणार कुक्कुटपालन व्यवसायाच्या वृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार

कुक्कुटपालन व्यवसायात वृद्धी व्हावी, तो शेतकरी हिताचा व्हावा या दृष्टीने आणि महाराष्ट्र अंडी समन्वय समितीची (एमईसीसी) स्थापना करण्याच्या अनुषंगाने सर्वंकष विचार करून अहवाल सादर करावा. त्याचा सकारात्मक विचार करून राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पदुम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, गोवंश प्रजनन नियमावली तयार करा आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मेपर्यंत हरकती मागवा

गाय, म्हैस यांचे दूध वाढण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेचे प्रजनन योग्य नर तयार करण्यासाठी गोवंश प्रजनन नियमावली राज्य शासन तयार करीत आहे. मात्र पशुपालक, गोपालकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मे २०२३ पर्यंत हरकती मागविण्याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केली. शिवाय …

Read More »

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण… काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने तातडीने ‘काजू बी’साठी हमीभाव जाहीर करावा;

नैसर्गिक आपत्तीमुळे काजू उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत असतानाच व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीला योग्य दर मिळत नाही. काजू उत्पादकांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाला चाप लावून ‘काजू बी’साठी १६० रुपयांचा हमी भाव जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे …

Read More »

पौष्टीक तृणधान्यासंदर्भात विविध विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबवा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे निर्देश

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्यात आपण महाराष्ट्र पौष्टीक तृणधान्य अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शालेयस्तरापासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दैनंदिन आहारातील पौष्टीक तृणधान्याचे महत्व पोहोचवण्यासाठी शासकीय विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केली. राज्य शासनाच्या …

Read More »

त्या निर्णयाचे स्वागत करत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांसाठी केल्या या ८ मागण्या हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेलाय...

मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रात अजित पवार म्हणाले की, मार्च …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील …

Read More »

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी या जिल्ह्यांना वितरीत राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन …

Read More »