Breaking News

शेतकरी बांधवांची दिवाळी गोड, लवकर मिळणार सरकारच्या या योजनेचा लाभ.. केंद्राच्या या योजनेचा लवकरच मिळणार शेतकऱ्यांना लाभ

शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळतो. राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात. यातील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा १५ वा हप्ता लवकरच मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेद्वारे, लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे हप्ते वर्षातून तीन वेळा म्हणजेच एकूण ६ हजार रुपये वार्षिक दिले जातात. यातिलाच आता १५ वा हप्ता लवकर जारी केला जाणार आहे. जर तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची लॅण्ड सीडिंग आणि आधार सीडिंग सारखी कामे पूर्ण असणे महत्वाचे आहे. नाहीतर तुमचा हप्ता अडकू ही राहू शकतो.

दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी देखील महत्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही. यामुळे लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. हे काम तुम्ही जवळच्या CSC केंद्रातून, बँकेतून किंवा pmkisan.gov.in या शेतकरी पोर्टलवरून सहज करू शकता.

या योजनेचा १४ वा हप्ता हा २७ जुलै रोजी जारी करण्यात आला होता. मात्र या योजनेचा पुढील हफ्ता कधी जारी होईल याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. दरम्यान, या योजनेचा पुढील हफ्ता हा दिवाळीपर्यंत मिळू शकतो अशी माहिती मीडियाद्वारे समोर आली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मराठवाडा – विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक-मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *