Breaking News

आयफोनचे ‘हे’ फिचर हेरगिरी आणि हॅकिंगपासून करते संरक्षण हे फीचर आपल्या आयफोनला ठेवेल सुरक्षित

माध्यमांवर सकाळपासून अॅपल, आयफोन आणि सुरक्षा धोक्याची चर्चा सुरू आहे. भारतातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांचे फोन टॅपिंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे मेसेज आले आहेत. हा संदेश स्टेट- स्पाॅन्सर्ट नावाने आला आहे. म्हणजे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न सरकारी प्रायोजित हल्लेखोराने केला आहे. अॅपलने असे एक फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्सला असे अलर्ट मिळतात. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी अॅपलचे एखादे फीचर ताबडतोब चालू करावे.

या फीचरच्या मदतीने युजरचे कमीत कमी नुकसान होईल.या फिचरचे कार्य त्याच्या नावाप्रमाणेच आहे. हा एक ऑप्शन मोड आहे आणि त्यात अनेक संरक्षणे उपलब्ध आहेत. हे फिचर केवळ निवडक लोकांसाठी डिझाइन केले गेले आहे. बहुतेक लोक अशा प्रकारच्या धोक्याला बळी पडत नाहीत. हे फिचर चालू केल्यानंतर, तुमचे डिव्हाइस पूर्वीसारखे काम करणार नाही.

हल्ले टाळण्यासाठी, डिव्हाइस फिचर मर्यादित करते. यामुळे तुम्ही अनेक फीचर्स वापरू शकणार नाही. हे फिचर iOS १६, iPad OS १६, Watch OS १० आणि macOS Ventura आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर उपलब्ध आहे. सदर फिरचर चालू करण्‍यासाठी, तुमच्‍या डिव्‍हाइसला लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करणे आवश्‍यक आहे.

आयफोन किंवा आयपॅडवर हे फीचर ऑन करण्यासाठी आधी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला Privacy & Security वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला लॉकडाउन मोड पर्यायावर जावे लागेल. तुम्ही येथे टॅप करून हे फिचर चालू करू शकता. यानंतर तुम्हाला डिव्हाइस रीस्टार्ट करावे लागेल आणि नंतर तुमचा पासकोड टाकावा लागेल.

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *