Breaking News

काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुख यांनी काकाच्या विरोधात ठोकला शड्डू बाजार समितीच्या अध्यक्षाच्या विरोधात आणला अविश्वासाचा प्रस्ताव

भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहिररित्या करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले हटाव मोहिमही सुरु केली. अखेर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने माजी आमदार आशीष देशमुख यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. विशेष म्हणजे देशमुख यांच्यावरएकीकडे निलंबनाची कारवाई झालेली असताना दुसरीकडे ते बाजार समितीच्या राजकरणात सक्रिय झाले असून त्यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधातच शड्डू ठोकत आव्हान दिले.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्यांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. कारण, काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोटपले आहे. नरखेड बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे, नरखेड बाजार समितीतील राष्ट्रवादीचे सभापती यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात उद्या मतदान होणार असून, राष्ट्रवादीचा सभापती नरखेड एपीएमसीमधून गेलेला असेल, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली.

पुढे बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादीच्या सभापतींविरोधात मोठ्या प्रमाणात संचालक मंडळात नाराजी होती. अविश्वास प्रस्ताव आणण्याकरता १८ पैकी ९ जण लागतात. हा अविश्वास प्रस्ताव पारित होण्याकरता १२ जणांची गरज असते. आमच्या लोकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. तेव्हा १२ जण आमच्याकडे आले. आता, यासंदर्भात उद्या २६ मे रोजी मतदान होईल आणि राष्ट्रवादीचा सभापती नरखेड एपीएमसीमधून गेलेला असेल, असा दावा केला.

आशिष देशमुख हे २०१४ मध्ये भाजपाच्या तिकिटावर काटोलमधून निवडून आले होते. त्यांनी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपाला रामराम केला. नंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक देखील लढवली. आता ते पुन्हा भाजपाशी जवळीक साधून आहेत. फडणवीस यांनी नुकतीच देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यापूर्वी देशमुख यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. भाजपा त्यांना सावनेर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरोधात मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *