Breaking News

कोरोना संसर्गाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने केली मोठी घोषणा आता आरोग्य आणिबाणी राहिली नाही

तब्बल तीन वर्ष संपूर्ण जगभरात कोरोनामुळे मोठी उलथापालथ झाली. ज्यामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं होतं, त्या कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने आणिबाणीच्या वर्गवारीतून वगळलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहिर केले की, कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणिबाणी राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अद्यनोम गेब्रेयसस म्हणाले, काल गुरूवार, ४ मे रोजी आपत्कालीन समितीची १५ वी बैठक पार पडली. यावेळी, माझ्याकडे शिफारस करण्यात आली की, मी जगभरात कोव्हिड-१९ आता जागतिक आरोग्य आणिबाणी राहिलेली नाही याबाबतची घोषणा करावी. मी त्यांचा सल्ला स्वीकारला असून याबाबतची घोषणा करत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की, ३० जानेवारी २०२० रोजी कोव्हिड-१९ ला त्यांनी जागतिक आणीबाणी जाहीर केलं होतं. ही घोषणा केली तेव्हा चीनमध्ये केवळ १०० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तोवर कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. परंतु तीन वर्षांनंतर ही संख्या ७० लाखांच्या पुढे गेली. आमच्या अंदाजानुसार या रोगामुळे आतापर्यंत जगभरात २ कोटींहून अधिक लोकांनी प्राण गमावले असावेत.

यावेळी डॉ. टेड्रोस यांनी हेदेखील स्पष्ट केलं की, कोरोना या रोगाला जागतिक आरोग्य आणिबाणीच्या कक्षेतून वगळलं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, कोरोना संपला आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे दर तीन मिनिटाला एका व्यक्तीचा जीव जात होता. आताही कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. तसेच या रोगाचे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *