Breaking News

अजित पवारांनी शेतकरीप्रश्नी साद घालत म्हणाले, अध्यक्ष महोदय आदेश काढा त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग...

आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करून तात्काळ निर्णय करावा – जयंत पाटील
सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडसावले.

राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान तुम्हाला हक्क, अधिकार मागण्या मागायचा आहे. परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत असे आवाहन अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले.

यावेळी अजित पवार म्हणाले, गारपीठीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरू असते त्यावेळी लोकांचे लक्ष असते. यातून न्याय मिळेल. शेतकरी अडचणीत आले आहेत. आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी ७५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पध्दतीने सर्व कर्मचार्‍यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार ? असा सवालही यावेळी केला.

संपाची माहिती देताना अजित पवार पुढे म्हणाले, काही तालुक्यात शाळा पालक आणि लोकं चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय. त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

गारपीठीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. संप सुरू आहे. पंचनामे करायला कोण नाही. महसुल नियमानुसार आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी. आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करावी. तात्काळ निर्णय करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केली.

त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले, मागील तीन-चार दिवसात मराठवाडा, विदर्भासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपीठ बरसते आहे, मराठवाड्यात ८ जणांचा मृत्यू झाला, अनेक जनावरे दगावली, सुमारे ६२ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले, सरकारने पंचनाम्यांच्या नावाने आदेश दिले पण संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला, काही ठिकाणी पंचनामे करत आहेत मात्र तलाठी किंवा कोणताही कर्मचारी त्यावर सह्या करायला तयार नाही. त्यामुळे पंचनाम्यांच्या नावाने वेळ काढण्यापेक्षा मंडळनिहाय रँडम सर्व्हे करून ते ग्राहय धरून तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणीही केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्याबरोबर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही भूमिका मांडली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांनी ५७ खाली मांडलेला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत आणि संपकरी कर्मचाऱ्यांमुळे पंचनामे घ्यायला कोणी नसल्याने याप्रकरणी स्थगन प्रस्ताव विधानसभेत मांडला. मात्र विधानसभा अध्यक्षांनी सदरचा प्रस्ताव फेटाळत विरोधकांना बोलण्याची संधी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *