Breaking News

शनि देवस्थानला १ कोटीची देणगी देणाऱ्या ओडिसा मंत्र्यावर गोळीबार पोलिस कर्मचाऱ्यानेच केला गोळीबारः रूग्णालयात उपचार सुरु

अनेक नागरीक आपल्या संकटाच्या किंवा अडचणीच्या काळात आपल्यासमोरील अडचणीचा डोंगर कमी व्हावा यासाठी कोणत्या तरी भोंदू भविष्यवेत्याने दिलेल्या सल्ल्यानुसार महाराष्ट्रातील शनी देवाचा धावा करतो. त्यामुळे अनेकजण अंधश्रध्देचे बळी ठरतात. ओडिसातील बीजेडीचे नेते तथा पटनाईक यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री नाबा दास यांनी काही दिवसांपूर्वी शनि शिंगणापूर देवस्थानला भेट देत १.७ किलो ग्रॅम सोन्याचा मुकुट आणि ५ किलो चांदी कलश असे मिळून जवळपास १ कोटी रूपयांचे दान दिले. मात्र आज त्यांच्यावर भरदिवसा पोलिसाने हल्ला करत गोळीबार केला. नाबा दास हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाबा दास हे बीजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते मागे ते महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी शनि शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयाहून अधिक किंमतीचे सोन्याचे कलश दान केले होते. ओडिसातल्या झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर जवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओडिसाचे आरोग्यमंत्री नाबा दास आले होते. त्यावेळी ते कारमधून उतरल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. एएसआयने त्यांच्यावर गोळीबार केला. त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळी का झाडली ते समोर आलेलं नाही. यानंतर तातडीने नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे.

नाबा किशोरदास यांच्यावर हा हल्ला होणं हा पूर्व नियोजित कट होता. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
ओडिसाचे कॅबिनेट मंत्री नाबा दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या एएसआयचे नाव गोपाल दास आहे असंही समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाल दास यांनी नाबा दास यांच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्या. ही घटना घडल्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Check Also

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *