Breaking News

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ‘या’ शासकिय पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी मुदतवाढ विशेष तुकडी प्रवेशासाठी अर्ज करण्यास ७ जुलैपर्यंत मुदतवाढ

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता ७ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा) आणि सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) तसेच शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे अल्पसंख्याकांसाठी विशेष तुकडी सुरु असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी १ हजार १५५ जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित तंत्रनिकेतनमध्येही प्रवेशाचा हक्क आहे. विशेष तुकड्यांमध्ये मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटींग टेक्नॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा उपलब्ध आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांना वार्षिक ७ हजार ७५० रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाची संधी आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचीही संधी मिळणार असून केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी ८ लाख रूपयांपर्यंत आहे. अर्ज भरण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ४०० रुपये तर मागासवर्गीयांसाठी ३०० रुपये इतके आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी कालावधी ७ जुलै २०२२ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://poly22.dte.maharashtra.gov.in तसेच ०२२- ६८५९७४३०, 8698781669, 8698742360 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मदरसा आधुनिकीकरण योजनाअल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आणि “धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांसाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना २०२२-२३ राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील “धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” सन २०२२-२३  राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ते शासनास सादर करण्याचा अंतिम ३१ ऑक्टोबर २०२२ राहील याची संबंधितांनी नोंद घेण्यात यावी, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *