Breaking News

राजच्या मदतीला देवेंद्र? काश्मीर फाईल्स आणि ३७० वरून साधला पवारांवर निशाणा १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या संख्येवरूनही साधला निशाणा

गेले काही दिवस मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आता त्यात भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीर फाईल्स चित्रपट, ३७० कलम आणि मुस्लिम धार्जिण्या वक्तव्यावरून शरद पवारांवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.
काश्मीर फाईल्स चित्रपटावरून शरद पवारांनी जवळपास दोन ते तीन वेळा भाजपाच्या धोरणावर टीका करत त्यांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. त्यास उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत ३७० कलम राज्य
घटनेत समाविष्ट करण्यास डॉ.आंबेडकरांचा विरोध होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसने ते कलम रद्द केल्यानंतर त्यास विरोध दर्शविल्याचे फडणवीसांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सांगत राष्ट्रवादी नेहमीच लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला.
त्यानंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मलिक हे मुस्लिम असल्यानेच त्यांचा संबध दाऊदशी जोडण्यात आल्याचे शरद पवारांनी वक्तव्य केले होते. शरद पवारांचे हे वक्तव्य त्यांच्या मुस्लिमांच्या लांगून चालनाचा ढळढळीत पुरावा असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
२०१३ साली मुंब्ऱ्यातील तरूणी इशरत जहाँ हिला निर्दोष असल्याचे प्रमाण पत्र दिले होते. त्यावर फडणवीसांनी टीका करत १९९३ साली मुंबईत १२ बॉम्बस्फोट झालेले असताना १३ बॉम्बस्फोट झाल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे त्यावेळी शरद पवार हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी होते. तरीही त्यांनी हे वक्तव्य केले. मतांसाठी किती खोटे वक्तव्य कराल असा सवालही त्यांनी यावेळी केला.
याशिवाय हिंदू टेरर हा शब्दप्रयोग पहिल्यांदा शरद पवारांनीच केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या सर्व वक्तव्यांसाठी शरद पवारांच्या झालेल्या बातम्यांच्या लिंक देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रत्येक वाक्यांना जोडलेले आहे.

 

Check Also

परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र नाराजी, अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल हा पक्षपाती

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की यूएस स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेला मानवी हक्क अहवाल “खूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *