Breaking News

भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहित नाहीः विधानसभेत गौप्यस्फोट करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी
होय मी भंगारवाला आहे. ‘भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहिती नाही’, विरोधक मला मी भंगारवाला आहे, असं म्हणतात. होय, मी भंगारवाला आहे. माझे वडील या शहरात कपड्याचे आणि भंगाराचे काम करायचे. माझ्या भावाचे आजही भंगाराचे गोडावून आहे. मात्र, एका भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, हे विरोधकांना माहिती नाही. एक भंगारवाला शहरातील बिनकामाच्या वस्तू गोळा करून, त्याचे तुकडे करून, त्याला भट्टीत टाकतो. त्याचप्रकारे नवाब मलिकसुद्धा या शहरातील जितक्याही बिनकामाच्या वस्तू आहेत. त्या जमा करून, त्याचे नटबोल्ट काढून, त्याला भट्टीत टाकून त्याचं पाणी-पाणी केल्याशिवाय शांत बसणार नाही आगामी विधानसभेच्या अधिवेशनात आणखी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला.
महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी वानखेडे यांनी कारवाईची मालिका सुरु केली, यात बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. योगी सरकार आपल्या राज्यात फिल्म सिटी घेऊन जाण्याचा विचार करत आहेत. मात्र हे बॉलिवूड उभारण्यासाठी अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी योगदान दिलेय. वानखेडे यांच्या परिवाराने मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे पत्र लिहिले. यावर भाजपाचे अनेक नेते पुढे आले आहेत. राक्षसाचा जीव हा पोपटात आहे. भाजपसारख्या राक्षसी विचारांच्या लोकांना आता चिंता वाटू लागली आहे की, जर पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खोट्या प्रकरणांमध्ये अनेक लोकांना तुरुंगात टाकल्याचा आरोप करत मागील एक महिन्यापासून परिस्थिती बदलली आहे. वानखेडे सांगतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला गेला. या आरोपाचे यांनी खंडन केले. समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो मला रात्री दोन वाजता मिळाला. ज्यांनी फोटो दिला त्यांनी माझ्याकडून हा फोटो माध्यमांपुढे यावा, अशी इच्छा व्यक्त केली. ही लढाई कोणाच्या धर्माशी अथवा परिवाराशी नसून ही लढाई अन्यायाविरोधातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मी कधीही मुंबईत राहून गोल्ड स्मगलींग केले नाही, मी कोणात्याही बॅंकेचे पैसे बुडवले नाही. माझ्या घरी कधीही सीबीआय किंवा ईडीची रेड झालेली नाही. प्रामाणिकपणे मेहनत केली. त्यामुळे मी भंगारवाला असून त्याचा मला अभिमान आहे, असेही म्हटले. ‘विधानसभेत गौप्यस्फोट करेल’ -पुढे बोलताना त्यांनी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्र, काशिब खान आणि एनसीबीला दिलेले पत्र, यासह विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी खरी लढाई आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात होणार असून त्यावेळी पुन्हा गौप्यस्फोट करेल, त्यावेळी भाजपा नेते रस्त्यावर फिरु शकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *