Breaking News

वारी होणार पण, या तीनपैकी एका पर्यायाचा वापर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरील बैठकीत चर्चा

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वैभव आणि परंपरा म्हणून गणलेल्या गेलेल्या पंढरीच्या आषाढी वारी पायी करण्यास परवानगी नकारण्यात आलेली असली तरी वारी व्हावी या उद्देशाने वारकरी संप्रदायाच्या प्रमुख ७ पालख्यांसमोर तीन पर्याय ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार संताच्या पादुका निवडक लोकांच्या संगतीत वाहनाद्वारे, विमानाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरात आणण्याचा पर्याय देण्यात आले आहेत. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय तेव्हाची परिस्थिती पाहून घेण्याचे ठरले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वारकरी संप्रदायातील प्रमुख सात पालख्यांच्या विश्वस्तांबरोबर आज पुण्यात बैठक झाली.
त्यावेळी पायी वारी आणल्यास कोरोनाचा प्रसार होण्यास मदत होईल. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याचे मत अजित पवार यांनी मांडल्याचे कळते.
त्यावर मग वारी झाली पाहिजे मग त्यावर कोणता पर्याय आहे अशी विचारणा वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर अजित पवार यांनी निवडक लोकांच्या उपस्थितीत संताच्या पादुका वाहनाद्वारे, हेलिकॉप्टर किंवा विमानाने पंढरपूरात आण्याचे तीन पर्याय समोर ठेवण्यात आल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विकास ढगे आणि अभय टिळक यांनी सांगितले.
तसेच त्यावेळची परिस्थिती पाहून या तिन्हीपैकी एक निर्णय घेवून पंढरपूरला पालखी मार्गस्थ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दशमीला या सातही मानाच्या पालख्या पंढरपूरला जातील. मात्र त्या कशा न्यायच्या याबाबत पावसाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. तसेच त्यावेळी पोलिस, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि देवस्थानचे प्रतिनिधी बसून चर्चेतून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *